AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : झाडं कोसळली, लोकांची ताराबंळ, महाराष्ट्रात पाऊस परतला, सांगली ते धुळे..कुठं कुठं सरी बरसल्या?

खरीप हंगाम गेलेला असला तरी रब्बी हंगामात तरी चांगले पीक यावे, अशी शेतकरी आस लावून बसलाय. आगामी काळात चांगला परतीचा पाऊस व्हावा, अशी प्रार्थना शेतकरी करतोय. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आता चांगली बातमी समोर आलीय. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावलीय.

Maharashtra Rain Update : झाडं कोसळली, लोकांची ताराबंळ, महाराष्ट्रात पाऊस परतला, सांगली ते धुळे..कुठं कुठं सरी बरसल्या?
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 9:05 PM
Share

Maharashtra Rain Update : राज्यात सध्या दुष्काळ आहे. दुष्काळझळांमुळे शेतकरी होरपळून निघालाय. शेतातील हिरवेगार पीक उन्हामुळे जळून खाक झालेय. खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार वेगवेगळ्या मार्गाने मदत करतंय. दुसरीकडे खरीप हंगाम गेलेला असला तरी रब्बी हंगामात तरी चांगले पीक यावे, अशी शेतकरी आस लावून बसलाय. आगामी काळात चांगला परतीचा पाऊस व्हावा, अशी प्रार्थना शेतकरी करतोय. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आता चांगली बातमी समोर आलीय. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे आता शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जातेय. राज्यात कुठे-कुठे पाऊस झालाय, तसेच आगामी काळात पावसाची शक्यता काय? ते जाणून घेऊ या…

रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस आला, नागरिक सुखावले

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा मिळाला आहे. मात्र, रत्नागिरी, संगमेश्वरसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी

सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, वडीया, रायबाग तासगावच्या बलगवडे, कवठेमहांकाळ आणि डफळापूरसह आसपासच्या परिसरामध्ये पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर दुपारपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.

कोल्हापुरात पाऊस, भाविक ओलेचिंब

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावलीय. येथे काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी आल्या. या पावसामुळे अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एकच तारांबळ उडाली. आज सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अचानक पाऊस आल्याने भाविक ओलेचिंब झाल्याचे पाहायला मिळाले.

दोन-अडीच महिन्यांनंतर धुळ्यात पावसाची हजेरी

दुसरीकडे धुळे जिल्ह्यात तब्बल दोन ते अडीच महिन्यांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर, कुडाशी, वारसा, मोहगाव, बल्हाणे, सामोडे आणि बारीपाडा परिसराला वादळी पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. या झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटण्यासाठी शक्यता आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट