Marathi News Live Update : चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पाऊस
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Big breaking
Image Credit source: tv9
मुंबई : आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या वेदांतावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांता प्रकल्पावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. दुसरीकडे आजपासून भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. सीतारामन यांचा हा दौरा तीन दिवसांचा असेल. आज सीतारामन या पुण्यात दाखल होतील. या पार्श्वभूमीवर देखील आज राज्याच्या राजाकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Follow Us