AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 जुलैचा विजयी मेळावा एकत्र होणार का? राज ठाकरे म्हणाले…

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट)चा एकत्रित मोर्चा रद्द करण्यात आला आहे. आता ५ जुलै रोजी विजयी मेळावा होणार असल्याचे संजय राऊतांनी जाहीर केले. राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना मेळाव्याचे ठिकाण अद्याप निश्चित नसल्याचे सांगितले.

5 जुलैचा विजयी मेळावा एकत्र होणार का? राज ठाकरे म्हणाले...
| Updated on: Jun 30, 2025 | 12:18 PM
Share

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. यानंतर आता सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी विजयी सभा होणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले.

राज ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जुलैला विजयी मेळावा एकत्र काढण्याबद्दलच्या प्रस्तावावर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे तुम्हाला सांगू, असे म्हटले.

सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ

“काल मला संजय राऊत यांचा फोन आला होता. ते म्हणाले काय करायचं पुढे. म्हटलं मोर्चा तर रद्द करावा लागेल. ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायचा का. ५ तारखेला घेऊ का म्हणाले. म्हटलं घ्या. पण ठिकाण ठरवू नका. सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. तुम्हीही लावू नका. वर्तमानपत्र आणि चॅनलने हा विषय लावून धरला. अशा बाबत सर्व जागरूक असले पाहिजे. कुठे कुठे काय काय घडतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे तुम्हाला सांगू”, असे राज ठाकरे म्हणाले.

राजकीय लेबल लावू नये

यावेळी राज ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, म्हणून हा निर्णय रद्द करण्यात आला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तुम्ही मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका. विजयी मेळावा झाला तरी लेबल लावू नका. युती आघाडी, निवडणुका येत जातील, पण मराठी भाषा संपली की परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवते. तीच मुळाशी गेली तर युती आघाड्यांना काय अर्थ आहे. युती आघाडीचा विचार आता करून चालणार नाही. या गोष्टीकडे संकट म्हणून पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नये”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

“उद्या मेळावा वैगरे काय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कळवेन. कोणताही अजेंडा नसेल. आधीच सांगितलं. मग नरेटिव्ह त्यांनी सेट केला की आम्ही. अजित पवार यांनीही विरोध केला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ना”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.