
पुण्यातील चाकण परिसरात एका महिलेता मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.. धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेच्या शरीरावर कपडे नव्हते… शिवाय शारीरावर अनेक जखमा देखील होत्या… मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की, महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली… त्यानंतर तेथील लोकांनी तात्काळ याबद्दल पोलिसांना महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती दिली…पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.. पण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलाचा बलात्कार आणि हत्या झालीच नव्हती… प्रकरण काही वेगळंच होतं…
पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा, धक्कादायक सत्य समोर अलं… महिलेवर बलात्कार झाला नव्हता आणि तिची हत्या देखील करण्यात आली नव्हती… तर महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेला… सीसीटीव्ही फुटेजनुसार, महिलेवर जळपास 6 ते 7 भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला केला. ज्यामुळे महिला गंभीर जखमी झालेली… कुत्र्यांच्या घोळक्यातून सुटका करून घेता न आल्यामुळे तिचा मृत्यू झाला, त्या कुत्र्यांनी महिलेचे कपडेही फाडून टाकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव शोभा विजय वाघमारे असं होतं… महिला मुळची नांदेड येथे राहणारी होती. सोमवारी 16 मार्चच्या रात्री जवळपास 2 वाजता महिला उड्डाण पुलाच्या खालून जात होती. याच दरम्यान, काही भटक्या कुत्र्यांनी महिलेला घेरलं. महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी दगड उचलले आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.. पण कुत्र्यांनी एकत्र महिलेवर हल्ला केला… कुत्र्यांनी महिलेचे कपडे फाडले आणि हात, पाय, मान व चेहरा अनेक ठिकाणी ओरखडले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याचा हल्ला सुमारे 15 मिनिटे चालला. या काळात, ती महिला गंभीर जखमी झाली आणि अतिरक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी जेव्हा महिलेता मृतदेह लोकांना दिसला, तेव्हा अनेक चर्चा रंगल्या… काहींनी तर बलात्कार आणि हत्या झाल्याचं देखील सांगितलं… त्यानंतर चाकण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे फुटेजमधून उघड झाले.
घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर, चाकण, मेदणकरवाडी आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना पकडावे अशी मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.