ललितकुमारला जोडीदार सापडली, लिंगबदल झालेला बीडचा कॉन्स्टेबल विवाहबंधनात

शरीरातील बदलामुळे दोन वर्षापूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केलेला ललिताचा ललित बनलेला तरुण विवाह बंधनात अडकला (Lalit kumar marriage) आहे.

Lalit kumar marriage, ललितकुमारला जोडीदार सापडली, लिंगबदल झालेला बीडचा कॉन्स्टेबल विवाहबंधनात

बीड : शरीरातील बदलामुळे दोन वर्षापूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केलेला ललिताचा ललित बनलेला तरुण विवाह बंधनात अडकला (Lalit kumar marriage) आहे. औरंगाबादमध्ये स्थळ पाहण्यासाठी गेलेला ललितने चट मंगनी पट ब्याह केला आहे. औरंगाबाद येथील वेरूळ अजंठा येथील बौद्ध विहारात ललितचा विवाह पार पडला.

ललित कुमार काल (16 फेब्रुवारी) औरंगाबाद येथे स्थळ पाहण्यासाठी गेला होते. त्यावेळी त्याच्या कुटुंबाने मुलीकडील पाहुण्यांना ललिताचा ललित कुमार होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास सांगितला. यानंतर मुलीकडील लोकांनी हे सर्व ऐकूनही होकार दिला. यानंतर ललितचा साखरपुडा पार पडला. तसेच काही वेळातच औरंगाबदमधील वेरूळ अजंठा येथील बौद्ध विहारात तो विवाह बंधनांत अडकला.

बीडमधील माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात ललिता जन्माला आली. त्यानंतर 2010 मध्ये ललिता महिला कर्मचारी म्हणून पोलीस खात्यात रुजू झाली. पोलीस दलात कार्यरत असताना त्याच्या शरीरात अचानक बदल जाणवू लागले. त्यानंतर ललितावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ललिताचा ललित झाला. या शस्त्रक्रियेची चर्चा राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात झाली होती. दरम्यान लिंगबदल शस्त्रक्रिया करणाऱ्या पोलीस दलातील तो एकमेव कर्मचारी (Lalit kumar marriage) आहे.

Lalit kumar marriage, ललितकुमारला जोडीदार सापडली, लिंगबदल झालेला बीडचा कॉन्स्टेबल विवाहबंधनात

ललितच्या शरीरात लहानपणापासूनच मुलांचे हार्मोन्स होते. पण त्याच्या लैंगिक अवयवाची वाढ झाली नसल्याने आई-वडिलांनी त्याचा मुलगी म्हणून सांभाळ केला. वर्षभरापूर्वी शरीरात काही बदल जाणवू लागल्याने आपण पुरुष असल्याचा भास त्याला झाला आणि त्यांनी मुंबई येथील डॉक्टरकडे तपासणी केली असता लिंगबदल शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता.

दरम्यान ललित कुमार सध्या माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो. ललित कुमारचा विवाह झाल्यानंतर तो माजलगावला परतला (Lalit kumar marriage) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *