मोठी बातमी! मुंबईतील नागपाड्यात मोठी दुर्घटना, पाण्याच्या टाकीत गुदमरून 5 कामगारांचा मृत्यू

मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे, पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! मुंबईतील नागपाड्यात मोठी दुर्घटना, पाण्याच्या टाकीत गुदमरून 5 कामगारांचा मृत्यू
crime scene
| Updated on: Mar 09, 2025 | 9:38 PM

मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीमध्ये उतरले होते. मात्र जीव गुदमरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील नागपाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आता उतरलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीत उतरले मात्र त्यांना जीव गुदमरल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर या मजुरांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं  मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं आहे. हे पाचही कामगार कंत्राटी असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, हे मजूर टाकीची साफसफाई करण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरले होते. मात्र त्यांचा जीव गुदमरला, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पंरतु त्यांचा मृत्यू झाला.  टाकीची साफसफाई करताना गुदमरूनच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांची नावं

दरम्यान आता या घटनेतील मृतांची नाव समोर आलेली आहेत.

हसीपाल शेख- वय वर्ष 19

राजा शेख – वय वर्ष 20

जियाउल्ला शेख – वय वर्ष 36

आणि इमांडू शेख – वय वर्ष 38 अशी या घटनेतील मृतांची नावं आहेत. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.