
मकर संक्रांतीचा सण राज्यभर उत्साहात साजरा होत आहे. तिळगुळ वाटून ‘गोड बोला’चा संदेश दिला जात आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दुसरीकडे, तुळजाभवानी मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त ओवाळणीसाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवेशाचे नियम बदलले आहेत.
नववर्षातील महिला आणि हिंदू धर्मात महत्वाचा असलेला सण म्हण मकर संक्रात. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून तिगूळ, तिळाच्या वड्या, हलवा एकमेकांना दिला जातो. तिळगूळ घ्या, गोड बोल अशा शुभेच्छांसह या सणाची सुरूवात होते. गुळाच्या पोळ्या, वर तुपाचा गोळा, नेतर उडवलेले पतंग अशी संक्रांतीची मजाच न्यारी असते. आज राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह दिसत असून सुट्टी नसली तरी अनेकांनी या सणाची सुरूवात देवदर्शनानेन केलेली पहायला मिळाली.
पुण्यातल सुप्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज दर्शनसाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. नववर्ष 2026 मधील महिल्या सणाच्या निमित्ताने , मकर संक्रात सणांच्या निमित्ताने आपल्या लाडक्या गणरायाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवून त्याचे आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. वर्षातील पहिला आपुलकीचा आणि स्नेहाचा सण म्हणून ओळख असलेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. गणरायाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मोठे उत्साहाचे वातावरण आहे
तुळजाभवानी मंदिरात मकर संक्राती निमित्त ओवाळण्यास येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्ती
दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिरात मकर संक्राती मोठी गर्दी होताना दिसत असून अनेक जण देवीचे आशिर्वाद घेऊन दिवसाची सुरूवात करताना दिसत आहे. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिरात मकर संक्राती निमित्त ओवाळण्यास येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतल्याचे समजते. आधार कार्ड असल्याशिवाय मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळणार नाही असेही सांगण्यात आलं आहे.
संक्राती निमित्त तुळजाभवानी मंदिरात येऊन देवीचे आशिर्वाद घेण्यास, तिला ओवाळण्यास तुळजापूर शहरासह इतर रिसरातील महिलांची मोठी गर्दी होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संध्याकाळाच्या वेळेतही महिला भाविकांची गर्दी होते हे लक्षात घेऊन आज संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान पुरुषांना मंदिरामध्ये प्रवेश बंदी असणार आहे. त्या वेळेत फक्त महिला या देवळात येऊ शकतात, असे जाहीर करण्यात आलं आहे.