मालेगाव चिमुरडीची अत्याचारातून हत्याप्रकरण : नराधमाविरोधात आक्रोश,संतप्त नागरिकांनी कोर्टाचा रस्ता अडवला

नाशिकच्या मालेगावात एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या चिमुरडीच्या हत्येने सर्वत्र नराधमाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या नराधमाची आज पोलीस कोठडीत वाढ होणार असताना कोर्टात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मालेगाव चिमुरडीची अत्याचारातून हत्याप्रकरण : नराधमाविरोधात आक्रोश,संतप्त नागरिकांनी कोर्टाचा रस्ता अडवला
Updated on: Nov 20, 2025 | 5:12 PM

मालेगावात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडल आहे.या प्रकरणातील आरोपीची पाच दिवसांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्याला कोर्टात सादर करण्यासाठी तयारी सुरु असतानाच कोर्टाच्या आवारात संतप्त नागरिकांना गराडा घातला आहे. नागरिकांनी कोर्टाचे गेट अडवून धरल्याने पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यामुळे आता आरोपीला कोर्टात कसे सादर करायचे यासाठी प्रशासन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय वापरते का हे पाहावे लागणार आहे.

नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या संतप्त प्रकाराचे राज्यात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. गावातीलच एका २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला. त्यानंतर या चिमुरडीचे डोके ठेचून तिची अमानुषपणे हत्या केली. या प्रकरणावरुन राज्यात नागरिकांना संतप्त प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.

कोर्टात होती तारीख

या प्रकरणातील आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला कोर्टात सादर करण्यात येणार होते. त्यावेळी कोर्टात संतप्त महिलांनी मोर्चा काढत ठीय्या मांडला. आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली.यावेळी नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीमार देखील केला. आता आरोपीला कोर्टात सादर करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सीचा वापर प्रशासन करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

चित्रा वाघ संतापल्या

भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला. अशी घटना ऐकल्यावर काळीज पिळवटून निघते. सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला. गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली. नंतर मृत्यू झाल्याचं समजलं आणि होत्याच नव्हतं झालं. प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे की, गावातील 24 वर्षाचा तरुणाचं एक महिन्यापूर्वी तिच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं. त्याने त्या निरागस बाळावर असूरी पद्धतीने राग काढला. तिच्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला. समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले होते.