मनोज जरांगे म्हणतात, मी कोणाचा सल्ला ऐकत नाही…पण प्रकाश आंबडेकर यांचा सल्ला मान्य

manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहे. त्याचवेळी ओबीसी नेत्यांची हिंगोलीत सभा होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिला. हा सल्ला आपण मान्य केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे म्हणतात, मी कोणाचा सल्ला ऐकत नाही...पण प्रकाश आंबडेकर यांचा सल्ला मान्य
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2023 | 10:06 AM

संजय सरोदे, छत्रपती संभाजीनगर, दि. 26 नोव्हेंबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरु केला आहे. त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यापूर्वी ते राज्यात सर्वत्र सभा घेत आहेत. त्याचवेळी ओबीसी समाजाकडून सभा घेतल्या जात आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला. हा सल्ला आपणास शंभर टक्के मान्य आहे. परंतु अजित पवार यांचा सल्ला मान्य नाही. त्यांनी आपणास सल्ला देण्याऐवजी आपल्या माणसांना सल्ला द्यावा, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला काय होता

संविधान सभेत बोलताना शनिवारी मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की “जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक तारतम्य बाळगावे, जी चूक सोनिया गांधी यांनी केली होती. ती त्यांनी करु नये. सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन विरोधकांना संधी दिली होती. यामुळे मराठा आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असे कृपा करुन आणू नये. कारण आरक्षणासाठी ही मोठी लढाई आहे.

आंबेडकर यांचा सल्ला मान्य

सोनिया गांधी यांनी जी चूक केली, ती तुम्ही करु नका, असा सल्ला प्रकाश आंबडेकर यांनी दिला. आंबेडकर यांनी दिलेला सल्ला मला मान्य आहे. पण मला कोणीच सल्लागार नाही. मी कधीच जातीवाद करत नाही. माझ्या परिसरातील सर्व जातीधर्माचे लोक माझ्यासोबत आहे. मी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आजपासून पूर्णमान्य केला. मी ती चूक करणार नाही.

अजित पवारांनी आपल्या लोकांना सल्ला द्यावा

जास्त करून शुभेच्छा आणि काही जणांना तर आजच्या दिवसापासून थोडा संविधानाचा त्यांनी त्या नियमाचा पालन करावे आपल्याकडे संविधानाने खूप मोठ्या अधिकार दिलेले जरा त्याचा भान ठेवून त्यांनी जरा काम करावं दुसऱ्या पुरोगामी विचाराने तुम्हाला काय होत नाही. अजित पवार यांनी आपणास सल्ला देण्याऐवजी त्यांचा लोकांना सल्ले द्यावे. कारण त्यांच्याकडून भडकाऊ भाषणे दिले जात आहेत.