AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजासाठी सर्वात मोठी खुशखबर, मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी मान्य? जरांगेंनी थेट सांगितलं!

मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. राठा समाजाच्या मागण्यांना सरकार मान्यता देत आहे ही चांगली बाब आहे. काही प्रमाणात सरकारने निर्णय घेतले आहेत. काही निर्णय घ्यायचे आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजासाठी सर्वात मोठी खुशखबर, मराठा-कुणबी मंत्रालयाची मागणी मान्य? जरांगेंनी थेट सांगितलं!
manoj jarange patil and maratha kunbi ministryImage Credit source: meta ai
| Updated on: Jun 06, 2026 | 2:49 PM
Share

Maratha Kunbi Ministry : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच शिक्षण आणि नोकरी यामध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला आहे. नुकतेच त्यांनी अंतरवाली सराटी येथे उन्हात बसून उपोषण सुरू केल्याने सरकारने त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या. सरकारने नुकतेच एक शासन निर्णय काढला आहे. या शासन निर्णयानुसार आता मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणेच सर्व सुविधा लागू होणार आहेत. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी केली होती. याबाबतही आता जरांगे यांनीच मोठा दावा केला आहे. मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो

मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा मिळतील, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना, मराठा समाजाच्या मागण्यांना सरकार मान्यता देत आहे ही चांगली बाब आहे. काही प्रमाणात सरकारने निर्णय घेतले आहेत. काही निर्णय घ्यायचे आहेत. परंतु जे निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांचेही मी आभार मानतो, अशा भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या.

जरांगे यांनी नेमका काय दावा केला?

तसेच, एखादे काम केले तर आम्ही शंभर टक्के श्रेय देणारे आहोत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे, असा दावे जरांगे यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या विकासासाठी सरकारने स्वतंत्र असे मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी केली जात होती. फडणवीस यांनी सरकारने असे मंत्रालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे जरांगे यांनी दावा केल्यामुळे मराठा समाजाच्या लढ्याला आलेले हे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा