मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा जिंकला, सरकारच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्या वतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आज सरकारच्या वतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारच्या वतीने पाच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते उपोषणाल बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान आज सरकारच्या वतीने प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी प्रसाद लाड यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्याची माहिती यावेळी प्रसाद लाड यांनी दिली आहे.
सरकारच्या पाच मोठ्या घोषणा कोणत्या?
ओबीसी समाजाला ज्या -ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती मराठा समाजाला देखील मिळणार असल्याचं प्रसाद लाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली होती, हैदराबाद गॅझेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ती अट देखील सरकारने यावेळी मान्य केली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळतील असं प्रसाद लाड यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. बार्टी महाज्योतीप्रमाणेच सारथीही यशस्वीरित्या राबवू असं अश्वासन देखील यावेळी प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयात मराठा कक्षासाठी कार्यालय देणार असल्याचं देखील यावेळी प्रसाद लाड यांनी जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे राज्यात 58 लाख कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सरकारकडून होणार असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
मी उद्या मंत्र्यांना घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतो, जरंगे पाटील यांनी उपोषण सोडावं अशी विनंती देखील यावेळी प्रसाद लाड यांनी केली. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोष सोडण्यास नकार दिला आहे, जोपर्यंत जीआर हातात येत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आधी हैदराबाद गॅझेनुसार प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करा मग उपोषणाचं बघू असंही यावेळी ते म्हणाले आहेत. आता पाणी पितोय, सलाईन लावतो, परंतु उपोषण सोडणार नाही, सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.