AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : सैफसमोर अमिताभ बच्चन यांचा मजेशीर सवाल; करीना मला काय म्हणेल? पुढे जे झालं ते भन्नाट!

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 18' मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबतच्या कौटुंबिक नात्याचा रंजक खुलासा केला. या नात्याची वीण थेट राज कपूर यांच्यापर्यंत कशी पोहोचते, हे बिग बींनी उलगडून दाखवलं. तसेच करीना कपूरशी असलेल्या नात्यावरही मजेशीर प्रश्न विचारला.

Amitabh Bachchan : सैफसमोर अमिताभ बच्चन यांचा मजेशीर सवाल; करीना मला काय म्हणेल? पुढे जे झालं ते भन्नाट!
Amitab Bachchan and Saif Ali Khan relation
| Updated on: Sep 02, 2026 | 9:57 PM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘कौन बनेगा करोडपती 18’ हा क्विझ शो सध्या बऱ्याच चर्चेत आहे. या शोमध्ये बिग बी लोकांना फक्त कोट्याधीश होण्याची, पैसे जिंकण्याचीच संधी देत नाहीत तर स्पर्धकांशी आणि प्रेक्षकांशी ते दिलखुलासपणे संवाद साधतात. मोकळपणाने गप्पा मारत अमिताभ हे अनेकदा त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी, काही किस्से सांगत असतात. नुकताच त्यांनी एक रंजक खुलासा केला आणि तोही अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्याशी असलेल्या फॅमिली रिलेशनबद्दल. खरंतर ‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सैफ अली खान हे दोघे KBC 18 मध्ये आले होते. अमिताभ यांनी दोघांनाही हॉटसीटवर बसवलं आणि गेम खेळता खेळताच त्यांनी फॅमिली कनेक्शनचाही उलगडा केला.

गप्पा मारता मारता अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना सांगितलं की, त्यांचं कुटुंब हे सैफ अली खानच्या कुटुंबाशी नात्यात आहे. विशेष म्हणजे, या नात्याची वीण थेट प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यांचं नातं कसं, हेही बिग बी यांनी उलगडून सांगितलं.

अमिताभ यांनी केला नात्याचा उलगडा

‘ बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की हे (सैफ अली खान) आमचे नातेवाईक आहेत. ज्येष्ठ (दिवंगत) अभिनेते राज कपूरजी यांची मुलगी, रितू नंदा यांच्या मुलाशी, निखिल नंदा यांच्याशी माझ्या लेकीचं (श्वेताचं) लग्न झालं आहे ‘ असं अमिताभ बच्चन म्हणाले. त्यानंतर गंमती-जमतीत त्यांनी हा संवाद आणखी पुढे नेला आणि सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा उल्लेख केला. करीना ही राज कपूर यांची नात आहे.

करीनाला मी काय म्हणू ?

पुढे अमिताभ यांनी मजेतच सैफला विचारलं की त्यांच्या कुटुंबातील गुंतागुंतीची नाती पाहता करीना त्यांना नेमकं कोणत्या नात्याने हाक मारणार ? ते म्हणाले, ‘ मला जाणून घ्यायचंय की मी करीनाला काय म्हणू? करीना मला काय हाक मारेल ?’ असा मजेशीर सवालही त्यांनी विचारला. मात्र त्याचं काही उत्तर देण्याआधीच सैफला हसू अनावर झालं आणि तो जोरजोरात हसू लागला. पुढे तोही मजेत म्हणाला, ‘बरं झालं हा काही या गेममधला प्रश्न नाहीये.’ त्याचा हा हजरजबाबीपणा पाहून प्रेक्षकही हसू लागले.

अमिताभ यांच्या मुलाशी होणार होतं करीनाच्या बहिणीचं लग्न

करीना कपूर हिची मोठी बहीण, अर्थात अभिनेत्री करीश्मा कपूर सर्वांनाच माहीत असेल. तर करीश्मा आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा, अभिषेक बच्चन या दोघांचं लग्न होणार होतं, त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र काही कारणांमुळे त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं. नंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न केलं तर अभिषेक आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं लग्न झालं.

दरम्यान अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान हे दोघेही ‘एकलव्य’ आणि ‘आरक्षण’ या दोन चित्रपटांत एकत्र झळकले होते. तर करीना आणि करिश्मा कपूर यांच्यासोबतही अमिताभ बच्चन यांनी काही चित्रपटांत काम केलं आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!