AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बालेन शाहांनी भारताविरोधात उचललं धक्कादायक पाऊल, आता थेट…

काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये महापूर आला, या महापुरामुळे देशात हाहाकार उडाला, हजारो लोकांचा मृत्यू झाला, सर्व पायाभूत सुविधा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र त्यानंतर आता बालेन शाह मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहेत.

मोठी बातमी! नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बालेन शाहांनी भारताविरोधात उचललं धक्कादायक पाऊल, आता थेट...
Balen ShahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 9:58 PM
Share

काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला. या महापुरामध्ये आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या बुधवारपर्यंत 1204 वर पोहोचली आहे. अजूनही 4216 लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या महापुराच्या तडाख्यामध्ये नेपाळचं प्रचंड नुकसान झालं आहे, मोठ्या प्रमाणात जीवितहानी तर झालीच परंतु त्याचबरोबर या प्रदेशातील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अजूनही बेपत्ता असलेल्या लोकांचा नेपाळ प्रशासनाकडून शोध सुरू आहे. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत चितवनमध्ये 348, नवलपरासी पूर्व मध्ये 217, नवलपरासी पश्चिमध्ये 190 आणि नुवाकोटमध्ये 155 मृतदेह आढळून आले आहेत. या महापुराच्या रुपाने नेपाळवर महासंकट आलं होतं. दरम्यान या संकटासाठी आता नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. भारताप्रमाणेच त्यांनी चीन आणि अमेरिकेला देखील जबाबदार धरलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी मोठं विधान केलं आहे. नेपाळवर जे महापुराचं संकट आलं ते हवामान बदलामुळे आलं आहे. मंगळवारी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हिमालयाच्या तापमानात वातावरणात झालेल्या बदलामुळे 1.8 सेल्सियस अशं तापमानाची वाढ झाली, त्यामुळे बर्फाचा एक मोठा खंड तुटला, नेपाळमध्ये महापुराचं संकट निर्माण झालं आहे.

दरम्यान द काठमांडूच्या एका रिपोर्टनुसार आता हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे 81 व्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे. तिथे ते हवामान बदलामुळे नेपाळला झालेल्या नुकसानाचा आणि नुकसानभरपाई मिळण्याचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्ता आहे. चीन, भारत आणि अमेरिका हे तीन देश ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन करणारे सर्वात मोठे देश आहेत, या तीन देशांची जबाबदारी आहे, ज्यामुळे हे संकट ओढावलं आहे, त्या देशांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असंही नेपाळच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. भारत, अमेरिका आणि चीनकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा