AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : लग्नाला 52 वर्षं झाली, पण जया यांच्यासाठी अमिताभ यांनी एकदाही केलं नाही हे काम..

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये नुकताच धक्कादायक खुलासा केला की, 5 दशकांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासाठी कधीच चहा बनवला नाही. त्याचं कारणंही त्यांनीच सांगितलं..

Amitabh Bachchan : लग्नाला 52 वर्षं झाली, पण जया यांच्यासाठी अमिताभ यांनी एकदाही केलं नाही हे काम..
Jaya and Amitabh Bachchan
| Updated on: Sep 01, 2026 | 9:15 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतलं प्रसिद्ध जोडपं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन ( Jaya Bachchan). त्यांच्या लग्नाला तब्बल 5 दशकं उलटलीत, 2 वर्ष झालीत त्यांच्या लग्नाला.मात्र बच्चन कुटुंब आणि स्पेशली अमिताभ-जया यांच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून मोठ्या पडद्यावर त्यांची जोडीही खूप गाजली. अमिताभ हे सध्या केबीसी होस्ट करत आहेत. त्यांनी नुकताच त्यांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत एक मोठा खुलासा केलाय. लग्नाला 5 दशकं होऊन गेलीत पण बिग बी यांनी आत्तापर्यंत कधीच जया बच्चन यांच्यासाठी 1 कप चहाही बनवलेला नाही.

अमिताभ यांनी कधीच बनवला नाही चहा

हो, हे खरं आहे,खुद्द बिग बी यांनीच या गोष्टीचा खुलासा केला. ‘कौन बनेगा करोडपती 18’ सध्या सुरू असून तुम्ही जया बच्चन यांच्यासाठी कधी चहा बनवला का ? असा सवाल पद्मिनी या स्पर्धकाने अमिताभ यांना विचारला. तो सवाल ऐकताच सगळे हसू लागले. मात्र अमिताभ यांचं उत्तर ऐकून तर प्रेक्षक हैराण झाले. बिग बी म्हणाले की त्यांनी आत्तापर्यंत कधीच जया यांच्यासाठी चहा केलेला नाही. त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बिग बी म्हणाले, मी स्वत: चहा पीत नाही आणि मला चहा करताही येत नाही, त्यामुळे जया यांच्यासाठीही कधीच चहा बनवला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मला येतच नाही तर..

स्पर्धकाच्या प्रश्नाचं अमिताभ यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिलं. ‘ हे पहा, जो माणूस स्वत: चहा पीतच नाही, तो बनवणार तरी कसा ? जया यादेखील फार चहा पीत नाहीत. त्या कधीतरीच चहाचे सेवन करतात . जो चहा त्या पीतात, तो कधी मी बनवून देत नाही कारण मला चह करताच येत नाही’ असं ते म्हणाले.

‘ पुढे ते म्हणाले, आजाकला चहा करण्यासाठी एक पुडी येते, त्याला धागा बांधलेला असतो. कपात फक्त गरम पाणी टाकयचं आणि ती पुडी. चहा तय्यार होतो. पण मी त्याचाही कधी वापर केला नाही. आता मी खरा चहा बनावयला शिकतोय, म्हणजे कधी जया यांना चहा प्यावासा वाटला तर मी त्यांच्यासाठी बनवू शकेन’ असं उत्तर बिग बी यांनी दिलं.

अशी सुरू झाली लव्ह स्टोरी

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं, तर त्या काळात जया एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर अमिताभ आपल्या करिअरमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. दोघांची भेट हळूहळू मैत्रीत बदलली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. जया अमिताभ यांच्या शांत स्वभावाने आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाल्या होत्या. दोघांनी एकत्र ‘गुड्डी’, ‘एक नजर’, ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. विशेषतः ‘जंजीर’ चित्रपटाशी संबंधित एक किस्सा त्यांच्या लग्नाशीही जोडला जातो.

1973 मध्ये थाटात लग्न

‘जंजीर’ चित्रपटाला यश मिळाल्यानंतर दोघांनी मित्रांसोबत परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. याचदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आणि दोघांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मात्र, कालांतराने जया यांनी अभिनयापासून काहीसं अंतर राखतत कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांकडे अधिक लक्ष दिलं. जया आणि अमिताभ यांना श्वेता आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत. तसेच सूनबाई, जावी, नातवंडं असं त्यांचं मोठं कुटुंब आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?