जरांगे ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय, रात्रीतून सूत्र हालणार, अंतरवालीतून मोठी बातमी
आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच आता जरांगे पाटील यांंनी मोठा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबरला मराठा बांधव अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.
आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी आता हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने सहकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याकडून मुंबईत आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी पुन्हा एकदा नवीन अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परवानगीसाठी तात्काळ अर्ज करा, नियम आणि अटीच्या कागदावर सह्या करण्यासाठी रात्रीतून तो कागद पाठवा, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर गंगाधर काळकुठे यांच्याकडून परवानगीसाठी नवीन अर्ज करण्यात आला आहे.
दरम्यान सोमवारी दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. उद्या मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरकारसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान नव्या अर्जानंतर तरी जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे आज वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी दोन दिवसांपासून सलाईन घेणं बंद केलं आहे, तसेच त्यांनी आता पाणी पिणं देखील बंद केलं आहे.