मनोज जरांगे बंजारा धर्मगुरूंच्या भेटीला, विदर्भ-मराठवाड्याचं राजकारण फिरणार? बंद दाराआड चर्चा, प्लॅन काय?

मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील हे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पोहोरादेवी येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज, धर्मगुरू सुनील महाराज यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज आणि जरांगे पाटील यांची बंद दाराआड चर्चा देखील झाली आहे.

मनोज जरांगे बंजारा धर्मगुरूंच्या भेटीला, विदर्भ-मराठवाड्याचं राजकारण फिरणार? बंद दाराआड चर्चा, प्लॅन काय?
manoj jarange
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 5:05 PM

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज आणि धर्मगुरू सुनील महाराज यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील, बाबूसिंग महाराज आणि सुनील महाराज यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. वीस मिनिटांपेक्षा अधिक काळ तिघांमध्ये चर्चा झाली.  दरम्यान या बैठकीमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बंजारा समाजाचं आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात ही चर्चा झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे, या लढ्यात त्यांना काही अंशी यश देखील आलं आहे, मात्र अजूनही हा लढा पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेला नाहीये, अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या या सरकारदरबारी प्रलंबित आहेत, त्यांनी यासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं, ते मुंबईच्या दिशेनं निघाले देखील होते, परंतु त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन वाटेतूनच माघारी घेतलं. त्यांनी आता सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. वाशिम जिल्ह्यात तर बंजारा समाज मोठ्या संख्येनं आहेच, परंतु मराठवाड्यात देखील बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान या भेटीमुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला बंजारा समाजाकडून देखील पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

Loading...

तर दुसरीकडे बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील प्रलंबित आहे, या भेटीमुळे मनोज जरांगे पाटील यांचा तसेच मराठा समाजाचा देखील बंजारा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: यावर  आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात आणि देशात बंजारा बांधवांची ताकद आहे, बंजारा समजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका मी मांडली आहे.  त्यांनी फक्त उसच तोडायचा का? बंजारा बांधवाच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? बंजारा, मराठा बांधव यांनी फक्त शेतातच काम करायचं का? मी मराठा समाज एकत्र केलाय.  बंजारा आरक्षणाचा मुद्दा मी समोर घेऊन जाणार आहे, अशी घोषणा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता विदर्भ आणि मराठवाड्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं जाणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us