मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, मला संपवण्याचा डाव…कारणही सांगितलं

मनोज जरांगे यांनी सत्ताधारी नेत्यांवर खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी मला संपवण्याचा डाव आखल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, मला संपवण्याचा डाव...कारणही सांगितलं
manoj jarange patil
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 2:42 PM

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप शेअर केल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता ऑडिओ क्लिपवरून मला संपवण्याचा डाव आहे. माझ्या घरावर देखील हल्ला करू शकतात, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘तुम्ही मला 500 कोटी देण्याचा आणि बदनाम करण्याचा घाट का घातला? तुम्ही आंदोलन संपवण्याचा, चिरडण्याचा घाट का घातला? माझ्यासाठी हे महत्वाचं आहे. तुम्ही तीन वर्षांपासून संकट उभं करत आहात. आमचे लोक फुटत नाही, त्यामुळे दादागिरी करून फोडले. मराठ्यांची लोक इनामदारी काम करत आहेत. त्यांना ईडी आणि एसआयटीच्या धमक्या दिल्या’.

Loading...

मराठा आंदोलकांना कशा प्रकारे धमक्या दिल्या जातात, याविषयी जरांगे यांनी खुलासा केला. त्यांनी आरोप करताना म्हटलं की, ‘ऐशोआरामाचं जीवन जगा. आंदोलनात काय ठेवलं…हीच वेळ असते… संधी साधून सोनं करा..आंदोलनात काय खरं आहे.. तुमच्या चौकशी होतील, असं सांगून मराठा सेवकांना फोडण्यात आले. दबावापोटी, बदनामी, चारित्र्यहनन यामुळे लोक खचून जातात. या धमक्या देत, माणसं पाठवून षडयंत्र रचलं जात आहे. तुम्ही इतके टोकाला का गेला…म्हणून याला संपवण्याची चर्चा… माझ्याविरोधात पार्टी फंड वापरू लागले. आमदारांना फोडलं. आंदोलन बदनाम करण्यासाठी काय पाऊले उचलली. ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर चांगल्या चांगल्याची  लोकांची डोके ठिकाणावर येईल. यातून सर्व मराठ्यांचं डोके उजाडेल’.

‘भयानक षडयंत्र रचलं गेलं. खूप मोठं बिंग फोडलं आहे. यांचा पडदा फाडून टाकला आहे. यामुळे सर्वच पक्षातील लोक जागे झाले. आमच्यासाठी हे मुळाशी जाणार आहे. त्यांचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा…खोट्या बातम्या पेरायच्या, यासाठी पैसा लावायचा. सगळे डाव आखले. शिंदे, फडणवीस हे मुळाशी जातील. मला त्यांना संपवायचं आहे.  मी प्रामाणिकपणे गरीब मराठ्यांना मोठे करतो, नोकरी लावून देतो. रक्त जाळतोय. पावलापावलावर संकट आहे. यातना भोगून करत आहे. या दुखातून चालत आहे. गरीबांचे कल्याण व्हावं, यासाठी करतोय. ते घरावर हल्ला करू शकतात, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us