‘सरकार कोणत्याही पक्षाचं, कोणतंही असो पण आपल्या,’..काय म्हणाले जरांगे पाटील?

महाराष्ट्रात कोणीच फायनान्सवाल्यांचे पैसे भरायचे नाहीत. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका,दुष्काळाचे हेही संकट जाईल असेही मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकार कोणत्याही पक्षाचं, कोणतंही असो पण आपल्या,..काय म्हणाले जरांगे पाटील?
manoj jarange patil
| Updated on: Nov 02, 2026 | 7:07 PM

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले,त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडमध्ये खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला होता. त्या कुटुंबाची मी भेट घेणार आहे. हा विषय सरकार दरबारी लावून धरणार असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. संकटे आपल्या पाठीला पूजली आहेत. शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी आत्महत्या करू नये. दुष्काळाचं हेही संकट जाईल,आत्महत्या करू नका तुमच्या पाया पडतो, लेकरा बाळाचं लयं हाल होतात असे भावनिक आवाहनही जरांगे यांनी यावेळी केले.

दरम्यान, आम्ही ताकदीने शेतकरी कुटूंबासोबत लढणार आहोत. फायनान्सवाल्यांना रुपया द्यायचा नाही. बघू कोण येते ते..महाराष्ट्रात कोणीच पैसे भरायचे नाहीत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, सरकारला वाटते मी मॅनेज होत नाहीए, त्यांचे ऐकत नाहीए, मग आता वारंवार आणखीन मराठ्यांच्या टीम बोलवायच्या. मराठ्यांना माझ्या विरोधात बोलायला लावायचे. पण मी त्यांना बोलणारच नाहीए, पण त्यांची खोड मोडत नाहीए. पण जे माझ्याविरोधात बोलायला लावणार त्यांना मी राजकीय करियरमधून संपविणार आहे असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Loading...

 

हे नाव उघडे पडले आहेत ना, शिंदे साहेबांचे लोक आणि फडणवीस साहेबांचे पण लोक आहेत. या दोघांचे पण लोक फूस लावून लोकांना बोलायला लावतात. तुम्ही आंदोलनाच्या विरोधात बोला, त्याला बदनाम करा,त्याच्याबद्दल काही पण सांगा. म्हणून त्यांची माझ्या विरोधात सारखीओरड सुरू झाली. पण आता माझ्या विरोधात एकही मराठा बांधव आंदोलनाच्या विरोधात बोलत नाही. आता सरकारने माझ्या विरोधात माझ्या विरोधात नवीन टीम उभी केली. सरकार काही महिला आणि काही माणसं विकत घेऊन माझ्या माझ्या विरोधात बोलायला लावते. मला बदनाम करण्यासाठी आपलीच लोक सरकार माझ्या अंगावर पाठवायला लागले, हे मराठ्यांनी समजून घ्या,सावध राहा असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकार कोणत्याही पक्षाचं कोणतंही असो पण….

2029 ला कुणाची तरी जिरवायची, मी म्हणेल त्याला मतदान द्या. मी पुढचे विषय आत्तापासूनच येथे सांगणार नाही, ते आतापासूनच वेगळं पाऊल टाकायला लागतील. योग्य वेळी आपण योग्य सांगितलं पाहिजे,सध्या तरी आमच्या डोक्यात एवढं फिट बसलंय, सरकार कोणत्याही पक्षाचं कोणतंही असो पण आपल्या हक्काचे चार ते पाच मराठ्यांचे मंत्री सत्तेत असायलाच पाहिजेत असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.  ते पुढे म्हणाले क, कारण बाकीच्या जातींना त्यांनी फोन केला की त्यांच्या समाजाचा मंत्री थेट फोन करतो आधार देतो, मदत करतो, पण आम्हाला समाजाचा आधार म्हणून कुठल्याच कामासाठी मंत्र्याचा फोन येत नाही. म्हणून आमच्यावर खोटे पण गुन्हे दाखल होतात, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात, आमच्या जमिनी बळकाविल्या जातात, प्लॉट बघितले जातात, अधिकाऱ्यांना त्रास होतो त्यांच्या व्यवसायाला त्रास होतो. विद्यार्थ्याला, शेतकऱ्याला त्रास होतो, असं असलं तरी आम्ही राजकारणात काही चाललेलो नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us