मोठी बातमी! मुंबईतील आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या, गुणरत्न सदावर्ते मैदानात, केली मोठी घोषणा
सरकारने परवानगी नाकाराली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मात्र याविरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे. त्यांनी शनिवारी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मुबंईमधील आपल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनाला सरकारने परवनागी नाकारली आहे. जरी सरकारने परवानगी नाकारली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मात्र त्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरल्याचं पहायला मिळतंय मोठी बातमी समोर आली आहे. कायद्याची तटबंदी असल्याशिवाय माणसे ऐकत नाहीत, आम्ही कायद्याची तटबंदी उभा करू असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या टोळीविरोधात तक्रार दाखल करणार आहोत. जयश्री पाटील या तक्रार दाखल करणार आहेत, अशी घोषणा देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
कायद्याची तटबंदी असल्याशिवाय असे माणसं ऐकत नाहीत, आम्ही कायद्याची तटबंदी निर्माण करू. पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मनोज जरांगे असभ्य बोलतात. मुंबई बंद करणारा बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणी नाही. कायदा या गोष्टी सहन करणार नाही. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे आम्ही याविरोधात तक्रार दाखल करणार आहोत. जयश्री पाटील तक्रार दाखल करणार आहेत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
गणेशोत्सव आहे त्यात विघ्न येऊ नये, याचा पोलिसांनी विचार करावा. सायंकाळी सहानंतर आंदोलनाला बसता येत नाही. मनोज जरांगे पाटील हे मुंबईला डिस्टर्ब करण्यासाठी येत आहेत. मनोज जरांगे पाटील हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. मनोज जरांगे पाटील हे दुकानदार आहेत, सिंडीकेट पद्धतीने दुकानदारी करत आहेत. जर या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तर कोणाचीच सुटका होणार नाही, असा इशारा यावेळी सदावर्ते यांनी दिला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.