AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटात झळकणार

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंह करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटात झळकणार
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 13, 2026 | 8:04 PM
Share

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील खास नातं सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत दिसतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह चर्चेत आला असून, तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबीर सिंहच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘टार्जन’ असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात अभिनेता सोराज पंचोली देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकतो. मात्र, चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून डेब्यूची चर्चा

अबीरच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा नवीन नाही. 2022 पासूनच त्याच्या पदार्पणाबाबत बातम्या समोर येत आहेत. त्यावेळी सलमान खान स्वतः अबीरसाठी चित्रपट तयार करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं जात होतं. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी सलमान खानने चर्चा केल्याच्याही बातम्या होत्या. जानेवारी 2023 पासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा कधीच झाली नाही.

मार्च 2023 मध्ये सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अबीरच्या डेब्यू प्रोजेक्टबाबत फारशी माहिती समोर आली नव्हती. आता पुन्हा ‘टार्जन’ या चित्रपटाच्या माध्यमातून अबीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abir (@abirsiingh)

सलमान खानचा आगामी चित्रपट

दरम्यान, सोराज पंचोलीचाही सलमान खानसोबत खास कनेक्शन आहे. सोराजने 2015 मध्ये सलमान खान निर्मित ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातून अथिया शेट्टीनेही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.

दुसरीकडे, सलमान खानच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘मातृभूमि’ आणि ‘SVC63’ यांचा समावेश आहे. ‘मातृभूमि’चं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. तर वामशी पैदिपल्ली दिग्दर्शित ‘SVC63’मध्ये सलमानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सलमान सध्या ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन करत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच