maratha reservation | मनोज जरांगे यांच्या सगे सोयऱ्यांच्या मागणीबाबत नेमका निर्णय काय ?

maratha reservation issue and manoj jarange patil | मराठा समाजातील आरक्षणासंदर्भात शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यातील महत्वाची मागणी असलेल्या सगेसोयऱ्यासंदर्भात काय झाला निर्णय...

maratha reservation | मनोज जरांगे यांच्या सगे सोयऱ्यांच्या मागणीबाबत नेमका निर्णय काय ?
| Updated on: Jan 26, 2024 | 4:16 PM

रणजित जाधव, नवी मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. या मागण्यांमध्ये सर्वात महत्वाची आणि आंदोलनाच्या कळीचा मुद्दा ठरलेली सगे सोयऱ्यांची मागणी मान्य झाली आहे. त्याचा अध्यादेश आज रात्रीतून निघणार आहे. तोपर्यंत नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील राहणार आहे. अध्यादेश मिळाल्यावर परत जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

नेमके सगे सोयऱ्याबाबत काय झाला निर्णय

सग्यासोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहणार नाही. शपथपत्रावर सग्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांचा मेसेज मनोज जरांगे पाटील यांनी सभेत वाचून दाखवला. त्यात म्हटले आहे की, ”सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही झाली आहे.”

सर्व सह्या झाल्या तर मग अध्यादेश का काढला नाही. काही करा. रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्री इथेच काढतो. आम्ही २६ जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे जे निर्णय घेतले. आदेश काढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडत आहे. अभ्यास करत आहे. तुम्ही आज रात्री अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही.

अध्यादेश आला म्हणजे तो वाचूनच निर्णय घेणार आहे. त्याआधी निर्णय घेणार नाही. आझाद मैदानाचा निर्णय उद्या सर्वांनी बसून घ्यायचा आहे. तुमच्याशिवाय निर्णय घ्यायच नाही. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.कुणीही आता आझाद मैदानावर जाऊ नका. आज इथेच थांबा. आराम करा. मी वकिलांशी चर्चा करतो, असे आवाहन त्यांनी केले.