
उदगीर : 95 व्या अखिल भारतीय (Marathi Sahitya Sammelan) मराठी साहित्य संमेलनाची तयारी ही पूर्ण झाली असून संमेलनाच्या पुर्वसंध्येलाच कार्यक्रमांची रेलचल सुरु झाली आहे. प्रथमच (Latur District) लातूर जिल्ह्यामधील (Udgir) उदगीर येथे संमेलन पार पडत असून त्यापेक्षा या संमेलन हे तीन राज्याच्या सीमावर्ती भागात होत असल्याने अगळेवेगळे ठरणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. संमेलन जरी लातूर जिल्ह्यात पार पडत असले तरी याला कर्नाटक, तेलंगणा येथील संस्कृतीची किनार राहणार आहे. शिवाय तीन प्रातांना जोडणारी ग्रंथदिंडी संमेलनाच्या पहिल्या दिवशी निघणार आहे. त्यामुळे संमेलनातील भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी तर राहणार आहेच पण सीमावर्ती भागामुळे वेगळेपण आले आहे.
उदगीर हे ऐतिहासिक शहर असून या संमेलनामुळे ते एका इतिहासाचे साक्षीदारही होणार आहे. येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या लगतच्या भागातील 36 एकरामध्ये व्यासपीठांसह विविध दालने ही उभारण्यात आली आहेत. साहित्यनगरीचे प्रवेशद्वार हे उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने बनवण्यात आले आहे तर या संमेलनाला भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह तर व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. ना.य.डोळे व्यासपीठ असे नाव देण्यात आले आहे.
उदगीर हे तीन राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेले शहर आहे. तीन्ही राज्याच्या संस्कृतीचा या शहरावर प्रभाव आहे. त्यामुळे ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवली जाणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंघ कारणाऱ्या या दिंडीचे नेतृत्व हे महिला करणार आहेत. तर कर्नाटकातील गुगल नृत्य प्रकारनुसार नृत्य करीत देवतेची पूजा केली जाणार आहे. तर मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शवणारी नवरंगदिंडी हे ग्रंथदिंडीचे तिसरे वैशिष्ट राहणार आहे. यामध्ये 500 विद्यार्थी हे 9 रंगाच्या टोप्या घालून सहभागी होणार आहेत.
अखिल भारतीय संमेलन हे उदगीर नगरीत पार पडत असून ही अभिमनाची बाब आहे. याची इतिहासात नोंद होणार असून साहित्यिकांच्या स्वागतासाठी ही नगरी सज्ज झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांचे हात या संमेलनासाठी राबत आहेत. त्यामुळे रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागतध्यक्ष तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी