Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिने उलटले तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. नियमित वेळी तोड न झाल्याने वजनात तर घट होत आहे पण आता ऊस फडातच वाळून जात आहे. आतापर्यंत एक ना अनेक पर्याय समोर आले पण तोडगा निघालेला नाही. पावसाळ्यापूरर्वीच अतिरिक्त उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. अन्यथा न भरुन निघणारे नुकसान होणार आहे.

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी
साखऱ कारखाना
राजेंद्र खराडे

|

Apr 21, 2022 | 1:38 PM

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिने उलटले तरी राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. नियमित वेळी तोड न झाल्याने वजनात तर घट होत आहे पण आता (Sugarcane) ऊस फडातच वाळून जात आहे. आतापर्यंत एक ना अनेक पर्याय समोर आले पण तोडगा निघालेला नाही. पावसाळ्यापूरर्वीच अतिरिक्त उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. अन्यथा न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. यावर आता शेवटचा पर्याय म्हणून (Other State) परराज्यातील यंत्रे ही उसतोडीसाठी राज्यातील विविध भागात दाखल होणार आहेत. सहकारी साखर कारखाना महासंघाने ही यंत्रे मागवली आहेत.

मे महिन्यात प्रत्यक्ष यंत्रे दाखल होणार

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक ना अनेक पर्याय समोर आले आहेत. आता गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत ही यंत्रे राज्यात दाखल होणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरवात होणार आहे. सलग महिनाभर तोड झाल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

80 लाख उसाचे गाळप शिल्लक

गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अजूनही 80 लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहेत. अशातच उसतोड मजुरांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस हा फडातच आहे. विशेषत: मराठावड्यात भयाण स्थिती असून शेतकरी ऊस पेटवून क्षेत्र रिकामे करु लागले आहेत. सर्वात मोठ्या नगदी पिकाची ही अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी शाश्वत उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.

मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न

कधी नव्हे ते मराठवाड्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, असे असतानाही केवळ तोडणी अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील परभणी, जालना, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय राज्यातील अन्य भागातही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही ही अवस्था झाली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडीचे योग्य नियोजन झाले आहे.

संबंधित बातम्या :

State Government : मेंढपाळांची भटकंती थांबणार, पशुधनविमा योजनेबाबत सरकारची भूमिका काय?

Baramati : उन्हाळ्यातील चारा टंचाईचा परिणाम दूध उत्पादनावर, शिल्लक ऊस आता जनावरांपुढे

Baramati: छत्रपती साखर कारखान्याची ऊस गाळपात सरशी, अतिरिक्त उसाचाही प्रश्न काढणार निकाली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें