सांगलीत वारणा नदी पात्रात मृत माशांचा खच, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

सांगली जिल्ह्यातील वारणा नदीवरील मांगले-काखे पूलाजवळ मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले आहेत. नदीपात्रातून दुर्गंधी येत असून, प्रदूषणामुळे हे मासे मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला पत्र पाठवून पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सांगलीत वारणा नदी पात्रात मृत माशांचा खच, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी
सांगलीत वारणा नदी पात्रात मृत माशांचा खच
| Edited By: Chetan Patil | Updated on: Dec 05, 2024 | 5:10 PM

सांगलीच्या वारणा नदीवरील मांगले-काखे पूलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच लागला आहे. नदीत दूषित पाणी आल्यामुळे मासे मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे. सकाळ पासून नदी पात्रात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. यासाठी प्रदूषण महामंडळ काय करणार? असा प्रश्न वारणा नदी काठावरील नागरिक विचारत आहेत. व्यवसायिक मासेमारी करणाऱ्या लोकांनी आज मिळेल तेवढे लहान मोठे मासे टेम्पोमधून घेऊन जावून विक्री केले आहेत. तर काही तरूणही मासे पकडताना दिसत होते. काही लोक स्वस्तात मिळणारे मासे खरेदी करून घरी घेवून जाताना दिसत होते.

मासे नेमके कशामुळे मेले आहेत? हे समजू शकलेले नाही. मेलेल्या माशांची दुर्गंधी मात्र नदी काठावर दोन्हीकडे पसरली आहे. चिकुर्डे जवळच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठीमागे मांगले काखे पुलापर्यंत पाणी तुंबवण्यात आले आहे. त्यामुळे या तुंबवलेल्या पाण्याची प्रचंड दुर्गधी पसरली आहे.

दरम्यान, येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस. पाटील यांनी सांगितले की, आम्ही वारणा नदीच्या पाण्यात मृत मासे अढळल्यामुळे पाण्याचा दुर्गंध येत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये, आरोग्य विभागाला तसे पत्र दिले आहे. गावात दवंडी देवून पाणी उकळून गळून पेण्याबाबत आवाहन केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us