साखर कारखानदारांबरोबरची बैठकी फिस्कटली, सरकारने ४,२०० रुपये दर देण्याचे मान्य केले..

ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी कालपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनात समेट घडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदारांची बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

साखर कारखानदारांबरोबरची बैठकी फिस्कटली, सरकारने ४,२०० रुपये दर देण्याचे मान्य केले..
Raju Shetti and Hasan Mushrif
| Updated on: Nov 05, 2026 | 10:13 PM

ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी कालपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, या आंदोलनात समेट घडवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखानदारांची बैठक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३९०० रुपये देण्यास सरकार तयार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कारखाना संपल्यानंतर १०० रुपये आणि ४५०० रुपये दरात वर्षभर साखर विकली तर आणखी २०० रुपये जादा देऊ असे ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मुश्रीफ यांनी ठेवला आहे. आता यावर राजू शेट्टी यांचे म्हणणे काय हे अजून समजू शकलेले नाही.

आम्ही ज्येष्ठ नेते प्रकाश अण्णा आवाडे, जिल्हाधिकारी आणि साखर कारखानदार यांच्याशी बोलणी केली असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. पहिल्यांदा आंदोलकांनी चार हजार दर सांगितला होता. नंतर राजू शेट्टी, संजय मंडलिक आणि आबिटकर यांच्याशी झालेल्या बैठकीत ३८०० दर ठरला. त्यानंतर पुन्हा प्रकाश अण्णा आवाडे यांनी ३८५० दर मागितला. आज पुन्हा झालेल्या बैठकीत पहिली उचल ३९०० रुपये देण्याचे ठरले. कारखाना संपल्यानंतर १०० रुपये देऊ असे मान्य केले आहे. ४५०० रुपये साखर वर्षभर विकली तर २०० रुपये जादा असे एकूण ४२०० रुपये देण्याचे मान्य केल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यावर आता राजू शेट्टी आणि आंदोलकांनी विचार करुन आंदोलन मागे घ्यावे असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

Loading...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे किणी टोलनाक्यावर (पुणे-बंगळुरू महामार्ग) मोठे आंदोलन सुरू आहे. कालपासून हा रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सोमोरे जावे लागत आहे. मुंबईला जाणारे भाजीपाला आणि दूधाचे टँकर अडवण्याचाही इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलेला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us