एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा वादात, आता केले औरंगजेबाचे उदात्तीकरण

एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी आता नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी क्रुर मुघल शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा वादात, आता केले औरंगजेबाचे उदात्तीकरण
Sahar Sheikh
| Updated on: Nov 04, 2026 | 7:21 PM

एमआयएमच्या मुंब्रा येथील नगर सेविका सहर शेख (Sahar Sheikh) पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. त्यांनी आता क्रुर मुघल शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. सहर शेख यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत औरंगजेबला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.’कैसा हराया’ या रिल्समुळे सहर शेख प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. आता त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

येथे पोस्ट वाचा –

Loading...

एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी महापालिकेतील निवडणूकीच्या विजयानंतर ‘कैसे हराया’ असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे रिल्स प्रचंड व्हायरल झाल्याने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतरही सहर शेख यांनी अनेक वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहाण्याचा प्रयत्न केला होता.

नवीन वाद काय ?

एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी आता क्रुर मुघल प्रशासक औरंगजेबाचे उदात्तीकरण केले आहे. सहर शेख यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर औरंगजेब आणि मुघलकालिन वास्तूंची स्तूती करणारे पोस्ट केली होती. चित्रपटात औरंगजेब यांना नेहमी व्हीलन म्हणून सादर केले होते. मात्र, त्याने अनेक जगप्रसिद्ध वास्तूंचे बांधकाम केले आहे. सात आश्चर्यापैकी एक असलेले ताजमहल मुघलांनी बांधले आहे असे म्हणत सहर शेख यांनी औरंगजेबला वाढदिवसाच्या शुभेच्छा करणारी पोस्ट शेअर केली आहे.

तर त्यांनी पाकिस्तानात जावे

यांना एवढे जर मुघल आवडत आहेत तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावेत असा सल्ला या प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. इकडे हिरवंकरण करण्यासाठी त्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत.  त्यांना या महादेवाच्या हिंदू भूमीवर उभे राहून अशी वक्तव्यं करता येणार नाहीत. असेल पार्सल आम्हाला पाकिस्तानात पाठवता येतात अशी टीकाही मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us