‘चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही स्तरावर…,’ रामदास कदम यांच्यावर मंत्री आदिती तटकरे यांची टीका

गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार राजेश पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दलही मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही स्तरावर..., रामदास कदम यांच्यावर मंत्री आदिती तटकरे यांची टीका
Minister Aditi Tatkare criticizes Ramdas Kadam
| Updated on: Nov 10, 2026 | 11:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आज रोहा येथे रामदास कदम यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रामदास कदम यांना सूचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

काही जणांना आपापल्या पद्धतीने चर्चेत राहायचे असते. मात्र चर्चेत राहताना आपण कोणत्या स्तरावर जात आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच महायुतीमधील काही विशिष्ट नेते इतर घटक पक्षांबाबत नकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत, प्रत्येकाने आपली भूमिका मांडताना महायुतीतील कोणताही घटक पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट केले. आपणच नकारात्मक भूमिका मांडत राहिलो, तर जनतेमध्ये महायुती सरकारबद्दल शंका-कुशंका निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले.

Loading...

दरम्यान, यंदाची दीपावली राज्यावर असलेल्या दुष्काळाच्या सावटाने अतिशय आव्हानात्मक असून, ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासोबतच महायुती ही दिवाळी साजरी करत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर व्हावे, यासाठी सरकार पातळीवर काम सुरू असून, नागरिकांमध्येही दुष्काळाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यंदाची दिवाळी सर्वांसाठी सुखसमृद्धीची, आनंदाची जावो आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, अशी सदिच्छा आणि प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे.

राजेश पाटील यांचे अभिनंदन

माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदिती तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पाडली जावी आणि त्यांचा कार्यकाळ यशस्वी व्हावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. रामदास कदम यांना अप्रत्यक्ष टोला लगावताना आदिती तटकरे यांनी महायुतीतील अंतर्गत टीकेवरही नाराजी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us