
मंत्री भरत गोगावले यांनी नुकताच मोठे विधान केले. होणाऱ्या आरोपांवर स्पष्टपणे बोलताना गोगावले दिसले. जी क्लिप फिरत आहे, त्यातले आम्हाला काही कळत नाही. चित्रलेखा पाटील ही आमच्या मुलीसारखी आहे. एवढे पैसे असते तर मुंबईला घर घेतले असते आता बँकेतून कर्ज घेतले आणि घर घेतले आहे. तुम्ही जरा वस्तुस्थिती चेक करा. महेंद्र दळवी यांनी जसा दावा ठोकला तसा आम्हाला पण करावे लागेल. आम्हाला केस टाकावी लागेल. कधी पण चौकशी करावी आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. आम्ही गरिबांचे शेठ आहोत नावाने शेठ आहोत. ते मोठे लोक आहेत त्यांच्याकडे असू शकतो. व्हायरल होणाऱ्या क्लीपवर स्पष्ट बोलताना गोगावले दिसले.
पुढे बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, शेतकरी कामगार पक्ष आता जिल्ह्यातून हद्दपार होत चालला आहे. आज त्यांचा एकही आमदार नाही. आम्ही पुढे जातोय म्हणून आम्हाला बदनाम करत आहे. अशाने ताकद कमी होत नाही. पूर्ण जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे भरत शेठ काय आहेत ते. चिटर असतो तर आठ वेळा निवडून दिले नसते. तटकरे आहे की दुसर कोण आहे हे आता नाही सांगू शकत.
तटकरे आणि दळवी यांचे आधी सख्य होत. आम्ही मर्द आहोत मर्द लोक असे करत नाहीत. मर्द होतो म्हणून 40 लोक जाऊन सत्ता पलटी केली. जे हतबल होत आहेत ते असे करत आहेत. दानवे ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. माणसाने जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. आम्ही खात्री केल्या शिवाय बोलणार नाही, असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
आमच्या नेत्यांनी पण सांगितलं आहे युतीत लढणार. आम्ही युती धर्म निवडणुकीत पाळला नाव कोणाचे घेणार नाही समझने वाले को इशारा काफी है.. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार वाद सुरू आहे. तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद चिघळला आहे.