मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार टीका, थेट राज ठाकरेंसह संजय राऊतांवर..

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरेंबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, बरेच दिवस या जंतर-मंतरकडे ते सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी यांनी सभा देखील घेतलेल्या आहेत, त्यांना थेट टोला गुलाबराव पाटलांनी मारला.

मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार टीका, थेट राज ठाकरेंसह संजय राऊतांवर..
Gulabrao Patil
| Updated on: Nov 29, 2026 | 12:04 PM

मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकताच मोठे विधान केले. उदय सामंत यांच्या विधानावर बोलताना त्यांनी म्हटले की,  सामूहिक निर्णय आहे. दिलेले आश्वासन आणि त्याबद्दल निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होत असतो. कॅबिनेटच्या बैठकीत निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून शिक्कामोर्तब होईल. राज ठाकरेंबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, बरेच दिवस या जंतर-मंतरकडे ते सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी यांनी सभा देखील घेतलेल्या आहेत, त्यांना थेट टोला गुलाबराव पाटलांनी मारला. चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, हेच तर आम्ही 2019 मध्ये सांगत होतो की आपण कुणाबरोबर जातो आहे. त्यावेळेस हे कळलं असतं तर आज हे दिवस आलेच असते.  संजय गायकवाड यांच्या विधानावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले, आम्हाला सुद्धा वाटतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा.

शेवटी या गोष्टी महायुतीच्या निर्णयावर होत असतात. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा यात काही गैर नाही. राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, असं चालतं का एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे. संजय राऊत कुठे अमित शहा कुठे. मागच्या दरवाजाने आलेला हा माणूस देशाच्या गृहमंत्राबद्दल बोलतो आहे…

Loading...

कोणाला बोलतो आहे याच देखील भान नाही. मला वाटतं बोलल्याने त्यांना प्रसिद्ध मिळत असते त्यामुळे ते त्यांचं वाचाळ बोलणं सुरू ठेवतात. राजकारण सोडून द्या ना त्यांना कोणताही म्हणत आहे. मल्लिकार्जुन खर्गे स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेणार आहे, यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले, शेवटी काय आहे, यासाठी दोघे कडचे नेते प्रयत्न करतील, आम्हीही प्रयत्न करू तेच ते सुद्धा प्रयत्न करतील.

देश हिताचं काय आहे याबद्दलचा निर्णय घेताना प्रत्येक नेता विचार करेल आणि त्या पद्धतीने प्रत्येक नेता हा निर्णय घेईल. ऑन चाळीसगाव मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उन्मेश पाटील बंडखोर उमेदवाराच्या बूथवर थांबून. जागेवरून नाराजी होती हे मान्य आहे मात्र त्यांनी बंडखोरी केले आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे. याचा अर्थ आम्ही महायुतीच्या बाहेरच्या माणसाला मतदान करू असा होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us