भंडारा येथील नागझिरा देवस्थानात चमत्कारीक घटनेचा दावा,पलाशच्या वृक्षातून पाण्याचा वर्षाव

भंडाऱ्याच्या नागझिरा देवस्थानातील ( पलाश ) पळसाच्या वृक्षातून रात्रीच्या वेळी पाण्याचे थेंब पडत असल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हा दैवी चमत्कार आहे की नैसर्गिक घटना याविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भंडारा येथील नागझिरा देवस्थानात चमत्कारीक घटनेचा दावा,पलाशच्या वृक्षातून पाण्याचा वर्षाव
A Shower of Water from the Palash Tree
| Updated on: Apr 25, 2026 | 7:36 PM

भंडारा येथील नागझिरा देवस्थान येथे सध्या एक विलक्षण आणि मनोहर दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. देवस्थान परिसरातील पळसाच्या झाडातून नैसर्गिकरीत्या पाण्याचे थेंब झरत असल्याचे दिसून येत आहे. या अनोख्या घटनेचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक श्रद्धेपोटी येत असून उत्सुकतेने येथे भेट देत आहेत. काहीजण याला दैवाचा चमत्कार मानत असून तर काहीजण निसर्गाचा अद्भुत चमत्कार असल्याचे सांगत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, आश्चर्य आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागझिरा देवस्थानातील हा निसर्गरम्य चमत्कार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भंडाऱ्यातील नागझिरा देवस्थानात रात्रीच्या वेळी ( पलाश) पळसाच्या वृक्षातून नैसर्गिकरीत्या पाण्याचे थेंब खाली पडत असल्याने भाविकांमध्ये आश्चर्य आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनोख्या घटनेचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून नागरिक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. काहीजण याला दैवी चमत्कार मानत आहेत. तर काहीजण निसर्गातील विलक्षण घटना असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि हा प्रकार चमत्कार असल्याचे म्हटले केले. त्यांच्या या विधानावरून टीका होत असून, डॉक्टर असूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर प्रत्युत्तर देताना, “भाजपच्या इतरांनी चमत्कार म्हटले तर चालते, मग मी म्हटले तर काय चुकीचे?” असाही सवाल भंडारा येथील खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केला आहे.

येथे पोस्ट पाहा –

काही “पाणी-झर वृक्ष” चा दाखला

जंगलात रात्रीच्या वेळी पाणी झरणारे वृक्ष आढळतात. त्यांना “पाणी-झर वृक्ष” (Water-drop tree) किंवा विशिष्ट प्रकारच्या सागवानी-रानटी वृक्षांत असा प्रकार सर्रास होतो. या झाडांच्या पानांतून बाष्पोत्सर्जनामुळे (Transpiration) रात्री पाणी थेंबाच्या रूपात पडते. हा चमत्कार साधारणपणे खूप पाऊस आणि जास्त बाष्प असलेल्या घनदाट जंगलात, विशेषतः पावसाळी रात्री पाहायला मिळतो. उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये ( Tropical Rain Forest ) हवेतील आर्द्रता जास्त असते, ज्यामुळे झाडांच्या पानांमधून अतिरिक्त पाणी थेंब रूपाने बाहेर पडते. कोकणच्या पट्ट्यातही अनेकदा रानटी झाडांमधून रात्रीच्या वेळी पाणी पडतानाचा अनुभव स्थानिकांना येत असतो असेही म्हटले जाते.

Follow Us