“काय बयाळ इंजीनिअर आहे हो तुम्ही, कोणत्या कॉलेजच्या शिकतात हे”

अमरावतीमधील अचलपूर मतदारसंघातील बच्चू कडू लोकप्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या मतदार संघातील नदीपात्रात पूर संरक्षक भिंतींचे काम सुरू आहे. या कामाची‎ आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी पाहणीत कामातील अनेक त्रुटींवर बोट ठेवत संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

काय बयाळ इंजीनिअर आहे हो तुम्ही, कोणत्या कॉलेजच्या शिकतात हे
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 12:24 PM

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आक्रमक आमदार म्हणून त्यांची शैली आहे. शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना ते चांगलेच धारेवर धरतात. बच्चू कडू यांनी नुकतीच एका विकास कामाची पाहणी केली. आमदार बच्चू कडू यांना नाला खोलीकरणाच्या कामात मोठी तफावत आढळून आली.

यावरून त्यांनी अभियंत्याला चांगलेच धारेवर धरले. अभियंते असूनही तुम्ही कामावर लक्ष देत नाही, चकरा मारत नाही, शासनाचा निधी एवढा अपव्य होत आहे, कसे काम करता. काय बयाळ इंजीनिअर आहे हो तुम्ही, कोणत्या कॉलेजच्या शिकतात हे? असे प्रश्न विचारून बच्चू कडू यांनी इंजिनीयरला चांगलेच घाम फोडले.

अमरावतीमधील अचलपूर मतदारसंघातील बच्चू कडू लोकप्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या मतदार संघातील नदीपात्रात पूर संरक्षक भिंतींचे काम सुरू आहे. या कामाची‎ आमदार बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी पाहणीत कामातील अनेक त्रुटींवर बोट ठेवत संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले. नदीपात्रातील‎ एका बाजुची संरक्षक भिंत पाहून‎ यामुळे पाण्याचा प्रवाह‎ योग्य होणार नाही, असे सांगत काही सूचना देखील केल्या.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू यांचा काही दिवसांपुर्वीच अपघात झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता . या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता. आता अपघातातून बरे झाल्यावर त्यांनी कामाला परत सुरुवात केली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.