दोन कोटींच्या सोन्याच्या हव्यासापोटी आधी मित्राचा केला खून, त्यानंतर मृतदेह पुरला शेतात, असा उघड झाला प्रकार

विजय घरुन दागिने व रोकड घेऊन निघाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. मग पोलिसांनी नितीन व विजयची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला.

दोन कोटींच्या सोन्याच्या हव्यासापोटी आधी मित्राचा केला खून, त्यानंतर मृतदेह पुरला शेतात, असा उघड झाला प्रकार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 9:01 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime News) वेल्हे तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक खून झाला होता. हा खून शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन भावांनी केल्याचे आधी सांगितले जात होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सोने-चांदीच्या हव्यासापोटी हा खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी १ कोटी ८३ लाख ७६ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय होता प्रकार

विजय प्रफुल्ल काळोखे (वय ३८, रा. आप्पा बळवंत चौक पुणे) यांची आंबी (ता. हवेली) येथे निघृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. ते घरुन तब्बल १ कोटी ८३ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने व रोकड घेऊन गेले होते. विजय याचे मित्र विजय निवंगुणे आणि नितीन निवंगुणे यांना हे कळाले. त्याने कात्रज येथील संतोषनगर येथे स्टिलच्या चिमटयाने विजय  काळोखे याच्या डोक्यात आणि तोंडावर वार केला. त्यात विजयचा मृत्यू झाला. त्यानंतर विजयचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरलमध्ये टाकला. हा बॅरल कारमध्ये टाकून तो मौजे रानवडी येथे नितीन निवंगुणे याच्या शेतजमिनीत पुरला.

हे सुद्धा वाचा

पोलीस चौकशीत झाला प्रकार उघड

विजय घरुन दागिने व रोकड घेऊन निघाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते. मग पोलिसांनी नितीन व विजयची चौकशी केली. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे ते देऊ लागले. यामुळे पोलिसींनी त्याला खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली देत घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवांगूने, विजय दत्तात्रय निवंगुने,ओंकार नितीन निवांगुणे आणि आणखी एक अशा चार जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी जप्त केला ऐवज

आरोपी ओंकार नितीन निवंगुणे त्याच्याकडून १ कोटी ५६ हजार किमतीचे एकूण २७४३ ग्राम १२० मि.ली. वजनाची सोन्याची विट व दागीने तसेच २९ ग्रॅम ६८० मिली वजनाचे चांदीचे दागीने  व रोकड असा एकूण १ कोही ८३ हजार ७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.