मुलीच्या हत्येनंतर आई-वडील रोज जात होते शेतात, मृतदेह जाळलेल्या ठिकाणी केली नागंरणी

राजीव गिरी

| Edited By: |

Updated on: Jan 28, 2023 | 8:32 AM

मुलीच्या हत्येनंतर आरोपी कोणाला संशय येऊ नये म्हणून नियमित कामे करत होती. आई-वडील दुचाकीवर नियमित शेतात जात होते, तर भाऊ नित्यनियमाने ग्रामदैवताच्या दर्शनाला जात होता.

मुलीच्या हत्येनंतर आई-वडील रोज जात होते शेतात, मृतदेह जाळलेल्या ठिकाणी केली नागंरणी
शुभांगी जोगदंडची कुटुंबीयांनी हत्या केली
Image Credit source: social media

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आलाय. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कुटुंबीयांनीच केला. परंतु हत्येनंतर कोणताही लवलेस कुटुंबीयांंना नव्हता. आपले देनंदिन उपक्रम त्यांनी सुरु ठेवले होते.

२३ वर्षीय शुभांगी जोगदंड ही नांदेडच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात BHMS च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु हे प्रेम कुटुंबीयांनी मान्य नव्हते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करुन दिली होती. मुलीने ही सोयरीकी आठ दिवसांत मोडली.

असा रचला कट

हे सुद्धा वाचा

आपली गावात बदनामी झाली, या कारणामुळे कुटुंबियांनी २२ जानेवारी रोजी तिची हत्या केली. मुलीची हत्या करताना हात थरथरु नये म्हणून आरोपींनी मद्य प्राशन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह खताच्या गोण्यात टाकून शेतात  नेला. शेतात ज्वारीच्या पिकांत सरण रचून शुभांगीचा मृतदेह जाळून टाकला. रात्री हा प्रकार केल्यानंतर सकाळी मृतदेहाची राख २२ किलो किलोमीटर असलेल्या गोदावरी नदीत जाऊन विसर्जित केली.

कसे फुटले बिंग

हत्येनंतर आरोपी कोणाला संशय येऊ नये म्हणून नियमित कामे करत होती. आई-वडील दुचाकीवर नियमित शेतात जात होते, तर भाऊ नित्यनियमाने ग्रामदैवताच्या दर्शनाला जात होता. परंतु गावात शुभांगी दिसत नव्हती. म्हणून नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महीपाल या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात कुजबूज सुरु झाली. एका ग्रामस्थाने पोलिसांना फोन करुन शुभांगीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांची चौकशी केली. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच खुनाची कबुली त्यांनी दिली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३ फेब्रवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

मोठ्या मुलीला कल्पना नव्हती

नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महीपाल गाव लिंबगाव पोलिस ठाण्‍यापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील लोकांचा शेती हेच उपजीविकेचे साधन. जनार्दन लिंबाजी जोगदंड हे मध्यमवर्गीय शेतकरी. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न गावातच झाले होते. परंतु बहिणीच्या हत्येची कल्पना तिला आली नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI