विधान परिषदेचा प्रचार आज संपणार, पण भाजप अजूनही तळ्यात मळ्यात

आमचे कोकण व मराठवाड्यात अधिकृत उमेदवार आहे. नागपूरच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. परंतु नाशिकमध्ये आमचा कोणताही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना आवडणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील

विधान परिषदेचा प्रचार आज संपणार, पण भाजप अजूनही तळ्यात मळ्यात
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 9:04 AM

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) भारतीय जनता पक्ष अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. पक्षाने एकाही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. यामुळे भाजपचे कार्यकर्ते मतदान कोणाला करणार? उघड नाही तर गुप्त पाठिंबा कोणाला आहे? या चर्चा सध्या सुरु आहे.

नाशिकमधील उमेदवारासंदर्भात टीव्ही ९ ने भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांच्यांशी संपर्क साधला. यावेळी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, यावर त्यांना प्रश्न केला. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांनी आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला नाही.

आमचे कोकण व मराठवाड्यात अधिकृत उमेदवार आहे. नागपूरच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. परंतु नाशिकमध्ये आमचा कोणताही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना आवडणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते मतदान करतील, असे बाबनकुळे यांनी सांगितले. परंतु महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला भाजपचे मत जाणार नाही.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये कशी लढत

नाशिकमध्ये शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये १६ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यांतच होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत आलेल्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे.

कोणते उमेदवार रिंगणात?

रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी अनिल शांताराम तेजा, अपक्ष अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष ॲड.सुभाष राजाराम जंगले,श्रीरामपुर, अपक्ष सत्यजित सुधीर तांबे, संगमनेर, अपक्ष नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष संजय एकनाथ माळी,जळगाव,

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.