AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्याच्या राजकारणामुळे सुनेला वेदना, नाथाभाऊंचे कुणी टोचले कान?; जळगावाचं राजकारण तापलं

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे रेव्ह पार्टी प्रकरणात अडकले. या कारवाईमुळे गिरीश महाजनांकडे खडसे हे बोट दाखवत आहेत. खडसे आणि गिरीश महाजन यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. खेवलकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली आहेत.

सासऱ्याच्या राजकारणामुळे सुनेला वेदना, नाथाभाऊंचे कुणी टोचले कान?; जळगावाचं राजकारण तापलं
Eknath Khadse and Raksha Khadse
| Updated on: Aug 13, 2025 | 5:50 PM
Share

राष्ट्रवादीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना एकनाथ खडसे यांनी चेकाळल्याच्या वक्तव्याच्या निषेध सुरू आहे. चाकणकरांच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर आली असून खडसे यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन देखील त्यांनी केले. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे रेव्ह पार्टी प्रकरणात अडकले. या कारवाईमुळे गिरीश महाजनांकडे खडसे हे बोट दाखवत आहेत. खडसे आणि गिरीश महाजन यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यावर प्रथमच रक्षा खडसे यांनी भाष्य केले आणि म्हटले की, मला वेदना होत आहेत. या भाष्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावली जात आहेत.

दुसरीकडे पतीसाठी रोहिणी खडसे ह्या पुण्यात तळ ठोकून आहेत. गिरीश महाजन म्हणत आहेत की, रेव्ह पार्टीचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे यावर न बोललेलं बरं तर दुसरीकडे एकनाथ खडसे म्हणतात हनी टॅप प्रकरणात प्रफुल लोढाला जेलमध्ये मारून टाकतील.  मात्र, यासर्व आरोपांमध्ये ज्या रूपाली चाकणकर ह्या अजित पवार पक्षाच्या आहेत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. एकही कार्यकर्ता त्याच्या समर्थनार्थ आंदोलनात दिसून आलेला नाही. त्याउलट भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते खडसेंच्या विरोधात आंदोलन जळगावात करताना दिसत आहे.

एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते खडसेंसाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. या सर्व आरोपांमध्ये विषय ठरला तो म्हणजे रक्षा खडसेंचे भाषण मला वेदना होत आहेत. त्यामुळे कुठेतरी या वादंगामुळे रक्षा खडसे नाराज असल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा या तिघांच्या वादाचा स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. रक्षा खडसेंनी आपले सासरे एकनाथ खडसे यांना सल्ला देण्याबाबत भाष्य केलं. रक्षा खडसेंना वेदना होत असतील तर कुटुंबावर आलं तर वेदना होतीलच. मात्र आपली पक्षनिष्ठा जपावी अशा प्रकारे रक्षा खडसेंना आमदारांनी सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नॉन्सेन्स राजकारण व्हायला नको. कुटुंबावर आल्यावर वेदना सगळ्याला होतात, पक्षनिष्ठा जपली पाहिजे. रक्षा खडसेंना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा खोचक सल्ला दिला आहे. राजकीय पक्ष घेऊन चालताना कुटुंब बाजूला ठेवावे लागते. एका कुटुंबात यात चार चार पक्ष असू शकतात किंवा पक्षाचा विषय येतो तेव्हा फक्त पक्षच पाहायला पाहिजे अशी महाराष्ट्राच्या इतिहासाची संस्कृती आहे, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा