
सोलापूरातील करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील २५८३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या पोमलवाडी गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून शरद पवार गटाची एक हाती सत्ता या कारखान्यावर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर नव्याने कामाला लागलेल्या माजी आमदार संजय शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील २५८३ मतांनी विजयी झाले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे 21 पैकी 21 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राखीव प्रतिनीधी मतदार संघातुन आमदार नारायण पाटील गटाचे राजाभाऊ कदम 1580 मतांनी विजयी झाले आहेत.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आमदार नारायण पाटील गटाचे डॉ. हरिदास केवारे, श्रीमान चौधरी, महादेव पोरे, दत्तात्रय गव्हाणे, रविकिरण फुके, दशरथ हजारे,आबासाहेब अंबारे, किरण कवडे, नवनाथ झोळ, संतोष पाटील हे 1 विजयी झाले आहेत.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर माजी आमदार संजयमामा शिंदे (सोलापूर) यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यांचा एकूण 1565 मतांनी पराभव झाला आहे.
आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गटाचे उमेदवार
किरण कवडे – 8571
नवनाथ झोळ – 8343
संतोष पाटील – 8328
दशरथ पाटील – 6701
बबन जाधव – 6837
नितीन राजे भोसले – 6708
रामदास झोळ गटाचे उमेदवार
प्रा रामदास झोळ – 1137
भरत जगताप – 766
प्रकाश गिरंजे – 765
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच सुमारे दीड ते दोन हजार मतांनी आघाडी घेतली होती. आदिनाथ कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनेल असले तरी खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्येच झाली आहे.