Rohit Pawar : रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

शरद पवार यांच्या पक्षातील धडाडीचे नेते तसेच आमदार रोहित पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकृती ठीक नसल्याने ते स्वत:च रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Rohit Pawar : रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
rohit pawar admitted to hospital
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 5:33 PM

Rohit Pawar Hospitalised : शरद पवार यांच्या पक्षातील धडाडीचे नेते तसेच आमदार  रोहित पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकृती ठीक नसल्याने ते स्वत:च रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात गेले आहेत, अशी प्रथामिक माहिती समोर येत आहे. ते रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. ते ब्रीच कँडी रुग्णालयात तपासण्या करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने काम करत आहेत. वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने त्यांचे दौरे सुरू आहेत. अधिक कामामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना ताप तसेच इतर त्रास जाणवत होता. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी याआधी डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार

त्यांनी आजदेखील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच इतरही काही महत्त्वाची कामे केली. परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी स्वत:च ब्रीच कँडी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाऊन ते तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. तसेच गरज भासल्याच काही तपासण्याही करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या प्रकृती कशी?

समोर आलेल्या माहितीनुसार रोहित पवार हे स्वत:च रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. ते फक्त काही तपासण्या करण्यासाठी गेले आहेत. लवकरच ते पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. रोहित पवार यांनी अलिकडच्या काळात वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी पेपरफुटी प्रकरणातही सरकारला धारेवर धरलं. ते नेहमीच तरुणांची बाजू लावूध धरतात. रोजगार, शिक्षण या मुद्द्यांवर ते नेहमी बोलत असतात. अलीकडेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात उपोषण केले होते. या उपोषणानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या अटी शिथील केल्या होत्या आणि लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us