मोठी बातमी! भोंदू खरात प्रकरणात रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; पैसे घेऊन….

Rohit Pawar Ashok Kharat : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भोंदू खरात प्रकरणात रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; पैसे घेऊन....
Kharat and Pawar
Image Credit source: Google
| Updated on: May 10, 2026 | 5:37 PM

भोंदू अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने भोंदुगिरी करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. त्याचबरोबर त्यांने काही आर्थिक घोटाळेही केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही समोर आलेले आहे. तसेच इतरही नामांकित व्यक्ती खरातच्या संपर्कात होते हेही समोर आलेले आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

रोहित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू खरात प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील 1% सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत. यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे.’

खरातवर कारवाई करण्याची मागणी

पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, ‘या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.’

चौकशी सुरू

सध्या भोंदू खरातची महिलांचे लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे. यातून दररोज नवनवे खुलासे होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us