रोहित पवार यांनी केली सरकारवर जोरदार टीका, दुष्काळाच्या मुद्द्यात..

सरकारकडून दुष्काळाची मोठी घोषणा करण्यात आली. सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यात रोहित पवार यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली.

रोहित पवार यांनी केली सरकारवर जोरदार टीका, दुष्काळाच्या मुद्द्यात..
Rohit Pawar
| Updated on: Sep 26, 2026 | 1:20 PM

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची घोषणा केली. जीआर त्याबाबतचा काढण्यात आला. राज्यात पावसाने पाठ फिरवली. शेतकरी राजा चिंतेत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी दुष्काळाची पाहणी केली. राज्यातील अनेक मंत्रीही बांधावर पोहोचले. त्यातच सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मोठे भाष्य केले. रोहित पवार यांनी म्हटले की, 72 पेक्षा भयानक दुष्काळ असल्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात. अशा परिस्थितीत एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हातात येणार नाही अशी आजची परिस्थिती. सरकारने आज शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मदत जाहीर करेल असे वाटले.मात्र, असे होताना दिसत नाही.अजूनही वेळ गेली नाही मदत जाहीर करा. अन्यथा सरकारला हे महाग पडेल.

NDRF च्या माध्यमातून हे येत असत.. मागील वर्षी अतिवृष्टीची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. 35 हजार कोटींची घोषणा केली व मिळाले शेतकऱ्यांना उभ्या 11 हजार कोटी बाकीचे कुठे गेले. पाण्यात बुडबुडे येतात तश्या सरकारच्या घोषणा आहेत, म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.

सरसकट मदत दिली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मग शेतकऱ्यांच्या बांधावर सरकार गेलं तो शो होता का..? भाजपाचा आमदार मेहता वाढदिवसाला करोडो रुपयांचे उधळण करतो.. तोच पैसा शेतकऱ्यांच्या मदतीला दिला असता तर.. फडणवीसंच आमदारांवर नियंत्रँ नाही हे यातून सिद्ध होतं. पक्षाचे ज्येष्ठ नेते पंढरपूरला आंदोलन करत आहे.

रयत संस्थेचा हा नियोजित कार्यक्रम असल्याने मी आज इकडे आलोय.आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी घेतोय. केंद्र सरकारकडून मदत मिळत असेल तर आम्ही एकत्र यायला तयार.. पवार साहेबाना बरोबर घेऊन पंतप्रधान मोदींची भेट घ्या..मागील वर्षी अतिवृष्टीची मदत गुजरातला जास्त आली.. महाराष्ट्राला कमी.. त्यामुळे असा भेदभाव न करता सगळ्या नेत्यांना एकत्रित करा आणि केंद्राकडे मदत मागा..आम्ही यायला तयार.. पण मदत आणा… असेही मोठे विधान रोहित पवार यांनी केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us