AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातून मोठी बातमी! मविआ बॅकफुटवर, 4 जागांवर उमेदवारच नाहीत; नेमकं कारण काय?

MLC Election : विधान परिषदेच्या 17 पैकी 4 जागांवर महायुतीचे उमेदवारच नाहीत. त्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राजकारणातून मोठी बातमी! मविआ बॅकफुटवर, 4 जागांवर उमेदवारच नाहीत; नेमकं कारण काय?
mva no candidates on 4 mlc seatsImage Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 7:01 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपली असून आता 4 तारखेपर्यंत अर्ज माघे घेता येणार आहेत. यानंतर कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत. त्यामुळे 17 पैकी 4 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. कोणत्या जागांवर महायुतीचे उमेदवार का नाहीत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नाशिक-नगरमध्ये महायुतीचा उमेदवार नाही

नाशिकमधील जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली होती. मात्र या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून AB अनिल कदम यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीकडून राणी लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, त्यामुळे नगरमध्येही महाविकास आघाडीचा उमेदवार असणार नाही.

सोलापूर-यवतमाळमध्ये उमेदवार दिला होता, पण…

विधान परिषद निवडणुकीत सोलापूरची जागा काँग्रेसला सुटली होती, मात्र आदित्य फत्तेपूर यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र आदित्य फत्तेपूर यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. बनावट स्वाक्षरीच्या आक्षेपामुळे हा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार असणार नाही. यवतमाळमध्ये काँग्रेसकडून साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. मतांची जुळवाजुळव जमली नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीचं पारडं जड

दरम्यान, 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील ही निवडणूक आहे, म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीने शानदार विजय मिळवला होता, त्यामुळे आता या निवडणुकीतही महायुतीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी