AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तारांच्या युती तोडण्याच्या विधानावर महाजनांचा पलटवार, म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

Girish Mahajan : शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी भाष्य केले आहे.

सत्तारांच्या युती तोडण्याच्या विधानावर महाजनांचा पलटवार, म्हणाले; 'लहान तोंडी मोठा घास...'
Girish Mahajan Comment on SattarImage Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 4:19 PM
Share

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपसोबत युती तोडण्यावरही भाष्य केले होते. याला आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी उत्तर दिले आहे.

सत्तारांचा भाजपवर आरोप

अब्दुल सत्तार यांनी,’जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल आमचे मुकुट गेले. आता छोट्या मोठ्या निवडणुकांमध्येही भाजपा लक्ष घालून आमच्या मध्ये दोन गट कसे पडतील हे पाहत आहे. आमचे मुंडके सत्तेपासून बाजूला केले, आता हळूहळू आमचे मुंडके छाटण्याचे काम सुरू आहे. कालचे नेते शिवसेना कमकुवत करण्याचे काम करत आहेत. मोठा भाऊ युती संपवत आहे’ असा आरोप करत युती संपवण्याची भाषा केली होती. याला आता महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्तार आता मोठे नेते झाले आहेत – महाजन

गिरीष यांना अब्दुल सत्तार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘अब्दुल सत्तार सध्या शिवसेनेचे खूप मोठे नेते झाले आहेत. ते तर आता युती ठेवायची की नाही यावर विचार करायला लागले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा घास कशाला घ्यायला पाहिजे. आपण आपल्यापुरतं बोला, जिल्ह्यापुरतं बोला. युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल सत्तार असं बोलत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये असा माझा त्यांना सल्ला आहे.’

मिठाचा खडा टाकू नये

पुढे बोलताना गिरीष महाजन यांनी म्हटले की, युती बाबत बोलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. सत्तार साहेब सध्या आमदार आहेत, त्यांनी असं बोलून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. यामुळे होणार काही नाही, पण अशी विधाने टाळावीत असा सल्ला महाजन यांनी सत्तार यांना दिला आहे.

काय म्हणाले महाजन?

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी