Delimitation Bill : ‘हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या..’ भाजपला साथ देण्याच्या शरद पवाराच्या निर्णयावर राज ठाकरेंची मार्मिक टिप्पणी

Delimitation Bill : या विधेयकाच्या मुद्यावरुन इंडिया आघाडीतील एक मोठा पक्ष फुटला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शरद पवारांवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे.

Delimitation Bill : हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या.. भाजपला साथ देण्याच्या शरद पवाराच्या निर्णयावर राज ठाकरेंची मार्मिक टिप्पणी
Raj Thackeray On Sharad Pawar
| Updated on: Nov 28, 2026 | 3:29 PM

सध्या सगळ्या देशात डिलिमिटेशन विधेयकाची चर्चा आहे. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पूनर्रचना विधेयक. मोदी सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विधेयकाच्या मुद्यावरुन इंडिया आघाडीतील एक मोठा पक्ष फुटला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शरद पवारांवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदम मार्मिक टिप्पणी केली आहे. “2 जुलै 2023 ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे 3 वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो” असं राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

“आज महाराष्ट्राचा सिंहसान सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं. त्याचा पहिला अंक पार पडला. पवारांच्या (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!” असं राज ठाकरे यांनी 2 जुलै 2023 च्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Loading...

 

केंद्रीय मंत्रीपद मिळणार अशा सुद्धा चर्चा

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशनच्या मुद्यावर जी भूमिका घेतली आहे, त्याचा संदर्भ इंडिया आघाडीतील पक्ष ते भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होतील याच्याशी जोडला जात आहे. सुप्रिया सुळे यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळणार अशा सुद्धा चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आठ खासदार आहेत. काल संध्याकाळी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांसमोर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आमचा पक्ष डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us