AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू; शहरातील रस्त्यांवरून राज ठाकरे भडकले; म्हणाले, ‘माणसं मेल्याचं…’.

राज ठाकरे यांनी नाशिकच्या खड्ड्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. सत्ताधाऱ्यांना माणसं मेल्याचं गेल्याचं काही सोयरसुतक नाही, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू; शहरातील रस्त्यांवरून राज ठाकरे भडकले; म्हणाले, 'माणसं मेल्याचं...'.
| Updated on: Aug 07, 2026 | 10:42 AM
Share

नाशिकमध्ये मागील काही दिवसांत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतरही रस्त्यावरील अपघात कमी होईना झाले आहेत. नाशिकमधील याच रस्त्याच्या खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून आंदोलने देखील केली जात आहेत.  आता यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रस्त्यावरील खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे.

राज्यात कंत्राटदार जन्मालाच आले नाही – राज ठाकरे 

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा होत आहे. राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करताना म्हटलं की, ‘तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर गोष्टी येताहेत. नाशिकमध्ये खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे माणसं गेली आहेत. परंतु येथील प्रशासन ढिम्म आहे. त्यांना माणसं मेल्याचं गेल्याचं काही सोयरसुतक नाही. त्यांना फक्त कमिशन कसे मिळेल हाच भाग आहेत. खरंतर अनेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आलेले नाहीत, हा भाग आहे’.

लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा – राज ठाकरे 

‘केंद्रातून आदेश येतील, त्यानुसार कुंभमेळे होताहेत. राज्यातील सर्व गोष्टी वरून आदेश आल्यावरच केल्या जाताहेत. या गोष्टी त्यांना लखलाभ असो. आम्ही केलेल्या गोष्टींच्या वाट लावल्या जाताहेत. दुसऱ्याने केली असल्याने वाट लावली जाताहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांचं काय झालं? सर्व स्मार्ट सिटी कुठे गेल्या? सर्व शहरं बरबाद होताहेत. ज्या प्रकाराने निवडणुका हाताळल्या जाताहेत, त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जाताहेत. लोकांनाही कळू लागलं आहे. मतदान करणाऱ्यांनाही या गोष्टी कळल्या पाहिजेत. नाशिकमध्ये झाडे तोडली जात असून याबाबत प्रशासन ढिम्म आहे. त्यानंतरही लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा. आम्ही अजून काय बोलू शकतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...