Raj Thackeray On GDP : नरेंद्र मोदींच्या GDP च्या दाव्यावर राज ठाकरे यांनी विचारला एकदम परफेक्ट निरुत्तर करणारा प्रश्न VIDEO

Raj Thackeray On GDP : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Raj Thackeray On GDP : नरेंद्र मोदींच्या GDP च्या दाव्यावर राज ठाकरे यांनी विचारला एकदम परफेक्ट निरुत्तर करणारा प्रश्न VIDEO
Raj thackeray
| Updated on: Sep 06, 2026 | 12:42 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. जीडीपीच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी एकदम रास्त, विचार करायला भाग पाडणारा प्रश्न विचारला. “जर, या देशाचा GDP 7.8 टक्के आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना सोनं खरेदी करु नका, परदेशात प्रवास करु नका, असं का सांगत आहेत?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. “किर्गिस्तानमधून मोदींनी परत एकदा सांगितलं की, कोणी परदेशात जाऊ नका. मला ही गोष्टच फार आवडली. परदेशातून भारतीयांना सांगायचं की, परदेशात जाऊ नका. परत सांगतायत ते परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करु नका. वर, आपल्याला काय सांगितलं जातय भारताचा आपला जीडीपी 7.8 टक्के आहे, जो अमेरिका, चीनपेक्षा पण जास्त आहे. मग परदेशी का नाही जायचं?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

“सोनं का नाही खरेदी करायचं?. घरामध्ये जेव्हा चणचण असते, काटकसर तेव्हाच सुरु होते. 7.8 टक्के आपला जीडीपी ग्रोथ आहे, या अमेरिका, चीन या देशांपेक्षा जास्त आहे. मग, या देशातल्या लोकांनी परदेशात का नाही फिरायला जायचं? सोनं का नाही खरेदी करायचं? याचं कारण आहे, सगळ्या देशाची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे” असा दावा राज ठाकरे यांनी केला. “पुढे-पुढे काय काय गोष्टी घडतील, आर्थिक दृष्ट्‍या होतील. आता नीटच्या प्रकरणात जेन झी रस्त्यावरती आलेत, उद्या अख्खा देश येईल. हे टाळी वाजण्यासारखं वाक्य नाही. तुम्ही नीट गांभीर्याने विचार करायची गोष्ट आहे, आपण चाललोय कुठे? आपण करतोय काय” असं राज ठाकरे म्हणाले.

Loading...

जातीच्या वादात गुंतवून ठेवायचय

“तु्म्हाला या सगळ्या गोष्टीत फक्त गुंतवून ठेवायचय. जातीच्या वादात गुंतवून ठेवायचय, धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचय, ज्यात तुम्ही गुंतून राहिलात की, बाकीचे प्रश्न विचारायला तुम्ही मोकळे नसता. देशामध्ये सर्वाधिक बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, पण आमच्यापर्यंत टेलिव्हिजन चॅनल कोणी पोहोचवायचं प्रयत्न करत नाही. इथले पत्रकार मला भेटतात, करायचय काय आम्ही हे बातम्याच देऊ देत नाहीत असं सांगतात” असा दावा राजा ठाकरे यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us