…अन् उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी ताफा थांबवला, ‘शिवतीर्थ’ समोर नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना रस्ता देण्यासाठी राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवल्याचं पाहायला मिळालं. सेना भवनला जात असताना उद्धव ठाकरेंचा ताफा 'शिवतीर्थ' समोरून गेला, त्यादरम्यान राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला.  

...अन् उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी ताफा थांबवला, शिवतीर्थ समोर नेमकं काय घडलं?
| Updated on: Jun 29, 2025 | 4:59 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्ता देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवल्याचं पाहायला मिळालं. सेना भवनला जात असताना उद्धव ठाकरेंचा ताफा ‘शिवतीर्थ’ समोरून गेला, त्यादरम्यान राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला, त्यानंतर आता या प्रसंगाची राजकीय वर्तृळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं? 

उद्धव ठाकरे यांना रस्ता देण्यासाठी राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला आहे. उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’ समोरून जात असताना राज ठाकरे यांचा ताफा देखील तिथे आहे. उद्धव ठाकरे सेना भवनकडे निघाले होते, त्यादरम्यान त्यांचा ताफा शिवतीर्थ समोर आला. त्याचवेळी राज ठाकरे यांचा ताफा देखील तिथे आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवल्याचं  पाहायला मिळालं.

युतीची चर्चा 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र हितापुढे आमचे वाद किरकोळ आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे .

दरम्यान सध्या राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदी सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची आहे. येत्या पाच जुलैरोजी हिंदी सक्तीविरोधात मुंबईमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.

येत्या काळात मुंबई महापालिकांची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या मोर्चाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही बंधू युतीसाठी आणखी एक पाऊल जवळ आले आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.