साहित्य संमेलन गीतामध्ये सावरकरांचा उल्लेख नसल्यामुळे मनसे आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

सावरकरांचा गीतामध्ये उल्लेख नसल्याचे समोर आल्यामुळे मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केलीय.

साहित्य संमेलन गीतामध्ये सावरकरांचा उल्लेख नसल्यामुळे मनसे आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
SWATRAVIR SAWARKAR
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 9:01 PM

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नसल्यामुळे वादाला तोंड फटले आहे. सावरकरांचा गीतामध्ये उल्लेख नसल्याचे समोर आल्यामुळे मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केलीय.

संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर तर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. या संमेलानासाठी गीत तयार करण्यात आले असून मिलिंद गांधी गीतकार तर संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. मात्र या गीतात सावरकर यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जातेय. सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असूनदेखील त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबतची नाराजी छगन भुजबळ यांना कळवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेतर्फे भुजबळ यांच्याकडे केली जाणार आहे.

मी स्वतः सावरकरप्रेमी, मला सावरकरांबद्दल नितांत आदर

या वादाला तोंड फुटल्यानंतर गीतकार मिलिंद गांधी यांनी प्रतिक्रिया दिलीय. कविता आणि गीत लिहिताना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे गाण्यामध्ये ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे. तो एकट्या सावरकरांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानासाठीही आहे. मी स्वतः सावरकरप्रेमी आहे. मला सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, असं गांधी यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

समीर वानखेडेंच्या कुटुंबीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, सत्याचा विजय नक्की होईल- क्रांती रेडकर

ST Workers Strike | एकीकडे संपाची तीव्रता वाढली, दुसरीकडे कारवाईचा बडगा, तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन

(MNS protest against swatantryaveer Savarkar name not mentioned in nashik marathi literature festival)