Mumbai Local : ना पाणी साचलं ना वायर तुटली.. माकडामुळे खोळंबली मुंबईची लाईफलाइन, ट्रॅकवर चक्क मर्कटाची एंट्री !
बोरीवली स्थानकात माकडाने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा काही काळ थांबवली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, माकडाची चांगलीच चर्चा आहे. त्याच वेळी मध्य रेल्वेवरही तांत्रिक बिघाडामुळे रखडपट्टी झाली, ज्यामुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.

लाखो मुंबईकरांना रोजच्या रोज सुखरुपपणे आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणारी, मुंबईची लाइफलाइन म्हणजे रेल्वे, लोकल.. सध्या जोरदार पावसाला सुरूवात झाली असीन अनेकदा पावासमुळे, पाणी साचल्यामुळे किंवा ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा खोळंबलेली असते. तशा बातम्या आपण अनेकदा वाचतो. मात्र बुधवारी सकाळी लोकल सेवा थोडा वेळ मंदावली ती एका माकडामुळे.. हो हो , तुम्ही बरोबर वाचलतं. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बुधवारी सकाळी काही काळ मंदावली होती ते ट्रॅकवरील माकडामुळे. त्याचा एका व्हिडीओही व्हायरल झाला असून सर्वत्र या मर्कटाचीच चर्चा सुरू आहे.
बोरीवली रेल्वे स्थानकात माकडामुळे मंदावली लोकल
पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी बोरीवली रेल्वे स्थानकात अचानक एक माकड ट्रॅकजवळ येऊन बसलं. त्यामुळे ही लोकल सेवा काही काळासाठी मंदावली होती. ट्रॅकवच्या माकडाला पहायला अनेक जण उत्सुक होते, ट्रेतेने पाहत नचा दरवाजा, खिडकीतून अनेक जण माकड उत्सुकतेने पाहत होते, काहींनी तर त्याची छबी मोबाईलमध्येही टिपली, काही प्रवाशांनी त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. मात्र थोड्या वेळाने हे माकडे ट्रॅकवरून निघून गेलं आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत सुरू झाली.
मध्य रेल्वेचीही रखडपट्टी
दरम्यान पश्चिम रेल्वे काही काळ खोळंबलेली असतानाच, बुधवारी सकाळच्या सत्रात मध्य रेल्वेहीकाही काळ खोळंबली होती. सकाळच्या सत्रात बदलापूर-सीएसएमटी लोकल सेवेची रखडपट्टी झाली. मालगाडी थांबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर लोकल वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र अनेक प्रवाशांना त्यामुळे त्रास सहन करावा लागला, काहींना कामावर पोहोचण्यासही उशीर झाला.लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कर्जतहून सीएसएमटी कडे जाणारी मालगाडी बराच वेळ बदलापूर स्थानकात थांबून राहिल्यामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला. तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी रखडल्याचं सांगण्यात येतय. 15 ते 20 मिनिटानंतर ही मालगाडी सीएसएमटीकडे रवाना झाली. मात्र यामुळे मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र थोड्या वेळाने लोकल वाहतूक हळूहळू पूर्व पदावर आली.
ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने
तसेच ट्रान्स हार्बर रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. नेरूळ रेल्वे स्थानक तांत्रिक बिघाड ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हर्बल लाईन रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे ठाणे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली.