Rahul Gandhi : भारत-पाकिस्तान संदर्भात एका पाकिस्तानी मुलाने अमेरिकेत राहुल गांधींना असा प्रश्न विचारला, त्यावर ते सरळ बोलले हे शक्यच नाही
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. इलिनॉय राज्यात शिकागो युनिवर्सिटीमध्ये एका कार्यक्रम झाला. त्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी एका पाकिस्तानी मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी एकदम ठणकावून उत्तर दिलं.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा अशक्य नाही असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटलं आहे. पण त्यासाठी पाकिस्तानला दहशतवादाचं समर्थन करणं बंद करावं लागेल. शिकागो युनिवर्सिटीत एका पाकिस्तानी विद्यार्थ्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. इराण आणि अमेरिकेत चर्चेमध्ये पाकिस्तान सक्रीय असताना भारत त्यात कुठेच नाही असं राहुल गांधी म्हणाले. अमेरिकेच्या इलिनॉय राज्यात शिकागो युनिवर्सिटीमध्ये कार्यक्रम झाला. त्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी जगाचे आपसातील संबंध, जागतिक मंचावर भारताची भूमिका आणि दुसऱ्या मोठ्या मुद्यांवर आपलं मत मांडलं.
या चर्चेमध्ये एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला. भारत आणि पाकिस्तान एक-दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी परस्परांच्या हितासाठी एकत्र येऊन ते काम करु शकतात का? राहुल गांधी या मुलाच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, “चर्चेची शक्यता नाकारता येत नाही. पण पाकिस्तान आमच्या देशाविरुद्ध दहशतवादाचं समर्थन करतो, प्रोत्साहन देतो, ही समस्या आहे.ही गोष्ट आम्हाला कदापि मान्य होणार नाही. आमचे निष्पाप नागरिक मारले जाणार आणि त्याचवेळी आम्ही पाकिस्तानशी चर्चा सुरु ठेवणार हे शक्य नाही. ज्यावेळी हे सर्व थांबेल त्यानंतर चर्चा सुरु होऊ शकते” असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.
There is a big problem, which is the support and encouragement of terrorism by Pakistan in our country.
It is impossible for us to accept our innocent people being murdered and have a conversation with Pakistan at the same time.
So, the moment that stops, a conversation can potentially begin.
: Shri @RahulGandhi at the University of Chicago
📍 United States
— Congress (@INCIndia) November 19, 2026
भारत फक्त पाहत बसलाय
याच कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यमान राजकारणात भारताचं जे स्थान आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “भारताने जागतिक चर्चेत सक्रीय राहिलं पाहिजे. पण भारत आता साइड प्लेयर बनलाय हे सत्य आहे. भारत फक्त पाहत बसलाय. त्याचवेळी पाकिस्तान अमेरिका आणि इराण मध्ये चर्चा घडवून आणतोय यावर राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. स्वातंत्र्य काळापासून भारताची जागतिक राजकरणाची समज खूप खोलवर आहे. आपल्या देशाचा एक विचार आहे. भारताचा फायदा कशात आहे, यावरुन परराष्ट्र धोरण ठरायचं. भारत एक आवाज आहे. पण तो आवाज आता दिसत नाही.भारत आता मागे पडलाय” असं राहुल गांधी म्हणाले.
