ठाकरे गटाला आणखी मोठं भगदाड? शिंदे गटातून गुप्त माहिती समोर; आता आणखी मोठं ऑपरेशन?

नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाची कल्याणकर यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात ठाकरे यांच्या पक्षातील आणखी काही मोठे नेते हे आमच्या पक्षात दाखल होणार आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

ठाकरे गटाला आणखी मोठं भगदाड? शिंदे गटातून गुप्त माहिती समोर; आता आणखी मोठं ऑपरेशन?
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2026 | 6:10 PM

UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणखी एक मोठी फूट पडली आहे. एकूण सहा खासदारांनी बंड केले असून ते नवा गट स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता लवकरच हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. ही फूट टाळण्यासाठी तसेच खासदारांवर पुढे कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने पक्षाच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एकीकडे खासदारांनी बंड केलेले अतानाच आता ठाकरे यांना आता दुसरा आणखी मोठा धक्का बसू शकतो.

नेमकी काय माहिती समोर आली?

नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात ठाकरे यांच्या पक्षातील आणखी काही मोठे नेते हे आमच्या पक्षात दाखल होणार आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ‘एकनाथ शिंदे सामान्य जनतेचे काम करणारे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षात प्रवेश सुरू आहेत. येणाऱ्या काळामध्ये अनेक खासदार आमदार मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत,’ असं थेट विधान त्यांनी केलं आहे..

आष्टीकरांचे 100 टक्के स्वागतच करू

तसेच, नागेश पाटील आष्टीकर पक्षात आले तर त्यांचे स्वागतच करू ते आल्याने पक्ष वाढेल, संघटन वाढेल, त्यामुळे आष्टीकरांचे 100 टक्के स्वागतच करू, असेही आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले आहेत.

दुसरीकडे खासदार फुटीवर शिवसेनेचे आमदार बाबुराव पाटील कोहोळीकर यांनीदेखील ठाकरे गटावर थेट निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक असून त्यांच्याकडे जायला कधी वेळ घ्यायची गरज पडत नाही. पण मातोश्रीवरून आपण परत आलोय. त्यामुळे शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे बाबुराव पाटील कोहोळीकर म्हणाले.

शिंदे साहेबांनी जर मला राजीनामा द्यायला सांगितलं तर…

खासदार नागेश पाटील आष्टीकर विद्यमान आमदार असताना कोहळीकर यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत बंड करीत आष्टीकराविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे आष्टीकर यांचा पराभव झाला होता. आता आष्टीकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत असे विचारले असता एकनाथ भाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला संभर टक्के मान्य आहे. पक्षात एक आणि एक दोनचीच बेरीज होते, त्यामुळे आष्टीकरांचे पक्षात निश्चितच स्वागत राहील. शिंदे साहेबांनी जर मला राजीनामा द्यायला सांगितलं, तर कुठली ही मागणी न करता मी दोन मिनिटात राजीनामा देईन, असेही ते म्हणाले आहेत.

Follow Us