‘निवडणुकीचं बाळकडू’, दीड महिन्याच्या बाळासह आई अर्ज भरायला केंद्रावर

नागपूरच्या एका मतदान केंद्रावर आपल्या दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या.

'निवडणुकीचं बाळकडू', दीड महिन्याच्या बाळासह आई अर्ज भरायला केंद्रावर
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM

नागपूर :  राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडालाय. जिकडे तिकडे अर्ज भरण्याची धावपळ सुरु आहे. उमेदवार आपल्या लवाजम्यासोबत मतदान केंद्रावर अर्ज भरण्यासाठी दाखल होतायत. अशातच आज नागपूरच्या एका केंद्रावर आपल्या दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या. (Mother with one and a half month old baby at the center to fill the Election Application)

“देवलामेटी गावचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय. यंदा माझी मुलगी क्रिशिता माझ्यासोबत आहे. यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात आम्ही नक्की बाजी मारु”, अशा भावना व्यक्त करत विजयाचा विश्वास महिला उमेदवार सपना नागपुरे यांनी व्यक्त केला.

“कोरोनाचा काळ असला तरी सर्व सूचनांचं पालन करुन आम्ही सर्वजण मतदान केंद्रावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलोय. अर्ज दाखल केला आहे. आता प्रचार आणि प्रत्यक्ष निवडणुकीची उत्सुकता असल्याचं” सपना नागपुरे म्हणाल्या.

स्थानिक भाजप आमदार समीर मेघे यांनी पुरस्कृत केलेल्या ग्रामविकास पॅनेलकडून संबंधित महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे. आतापर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा इथून पुढच्या पाच वर्षात करु, असा मानस नागपुरे यांनी व्यक्त केला.

VIDEO उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आई बाळासह केंद्रावर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यातील 14 हजार 232 ग्रामंपचांयतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज आणि जातपडताळणीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. तर, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज भरण्याची मुदत तीन वरुन साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ग्रामपंचायत अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवला, ऑफलाईन अर्जही स्वीकारणार : हसन मुश्रीफ

जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.